शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

NTR's Daughter Death: दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री NTR यांच्या मुलीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 18:33 IST

Uma Maheshwari Death: उमा माहेश्वरी या Sr. NTR यांची सर्वात धाकटी मुलगी आणि Jr. NTRची आत्या होत्या.

NT Rama Rao's Daughter Death: दिवंगत अभिनेते, TDP पक्षाचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव (NTR) यांची मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी उमा हैदराबाद येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमा माहेश्वरी यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. माहेश्वरी यांनी हैदराबादच्या जुबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतला. जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमा डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. 

सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माहिती मिळाल्यानंतर एनटीआर कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घरी येत आहेत. चंद्राबाबू नायडू त्यांची पत्नी आणि मुलासह दाखल झाले आहेत. उमा माहेश्वरी या ज्युनियर एनटीआरच्या आत्या होत्या. ज्युनिअर एनटीआर सध्या परदेशात असून, त्यांना उमा माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.कुटुंबीय त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेतेलगू देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी उमा माहेश्वरी सर्वात लहान होत्या. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दग्गुबती पुरंदेश्वरी आणि नारा भुवनेश्वरी या त्यांच्या बहिणी आहेत. नारा भुवनेश्वरी या TDP अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. उमा माहेश्वरी यांचे भाऊ एन बालकृष्ण अभिनेते आणि टीडीपी आमदार आहेत. 

एनटीआर यांच्या धाकट्या कन्या एनटी रामाराव हे अभिनेता, चित्रपट निर्माते आणि राजकारणी होते. त्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एनटीआरला 12 आपत्ये होती, यात आठ मुले आणि चार मुली. उमा माहेश्वरी या सर्वात लहान होत्या. अभिनेता आणि माजी मंत्री एन हरिकृष्णासह एनटीआर यांच्या तीन मुलांचेही निधन झाले आहे. 

टॅग्स :NTR Biopicएन.टी.आर. बायोपिकAndhra Pradeshआंध्र प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस