शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अवैध घुसखोर माघारी गेले नाहीत, तर गोळ्या घाला; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:54 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपा आमदाराचं भडकाऊ विधान

हैदराबाद : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन (एनआरसी) राजकारण तापलं आहे. आसामनंतर पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करण्याची मागणी भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपानं अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला आहे. एनआरसीवरुन राजकारण ढवळून निघालं असताना आता भाजपाचे हैदराबादमधील आमदार राजा सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अवैध घुसखोर मायदेशात परतले नाहीत, तर त्यांना गोळ्या घाला, असं भाजपा आमदार राजा सिंह म्हणाले आहेत. राजा सिंह हैदराबादमधील गोशमहल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. राजा सिंह यांच्या विधानाआधी बांगलाचे (पश्चिम बंगाल) भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी एनआरसीबद्दल भाष्य केलं होतं. बांगलामध्ये भाजपाची सत्ता आल्यास तिथेही एनआरसी लागू करुन घुसखोरांना हाकलून लावू, असं घोष म्हणाले होते. 'बांगलामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास आहेत. आम्ही यातील एकालाही सोडणार नाही. आता त्यांना अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. जे लोक घुसखोरांचं समर्थन करतात, त्यांनीही त्यांचं सामान बांधावं,' असं घोष म्हणाले. एनआरसीच्या मुद्यावरुन बांगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. या टीकेला केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ममता बॅनर्जी या मुद्यावरुन राजकारण करत असल्याची टीका सुप्रियो यांनी केली. '1971 मध्ये सव्वा कोटी लोकांनी घुसखोरी केली. मात्र ममता बॅनर्जी यांना फक्त त्यांच्या मतपेढीची चिंता आहे. त्यामुळेच त्याला एनआरसीला विरोध करत आहेत,' असं सुप्रियो यांनी म्हटलं.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAssamआसामcongressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी