शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Assam NRC Draft: अमित शहांची भाजपाला शाबासकी; पण राजनाथ सिंहांनी पाडलं तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:48 IST

Assam NRC Final Draft :केंद्रीय गृहमंत्र्यांनी भाजपाध्यक्षांना तोंडावर पाडलं

नवी दिल्ली: आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन राजकारण प्रचंड तापलं आहे. आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अमित शहांनी या मुद्यावरुन काँग्रेस लक्ष्य केलं. काँग्रेस आसाम करार लागू करण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र आम्ही या कराराची अंमलबजावणी करण्याचं धाडस दाखवलं, असं म्हणत शहांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं होतं. मात्र भाजपा वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. अमित शहांनी आज राज्यसभेत बोलताना 1985 मधील आसाम कराराचा संदर्भ दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार केला. मात्र काँग्रेस पक्ष या कराराची अंमलबजावणी करण्याची हिंमत दाखवू शकला नाही, असं शहा म्हणाले. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसला शहांनी लक्ष्य केलं. 40 लाख घुसखोरांना कोण वाचवू पाहतंय, असा प्रश्न शहांनी उपस्थित केला. यानंतर राज्यसभेत काँग्रेस खासदारांनी गोंधळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. अमित शहा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या मुद्यावरुन स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेत असताना पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं विधान अगदी उलट आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित नसल्याचं सिंह म्हणाले. 'एनसीआर लागू करण्यामागे सरकारचा कोणताही हात नाही. जे काही सुरू आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू आहे. त्यामुळे सरकारवरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत,' असं राजनाथ सिंह लोकसभेत म्हणाले.  

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीAmit Shahअमित शाहRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा