शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अयोध्येतील जमीन वादाच्या निकालाची आता प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 6:46 AM

४० दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल ठेवला राखून

नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा अंतिम निवाडा महिनाभरात होण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणाची प्रदीर्घ सुनावणी संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. खंडपीठाचे प्रमुख व सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने हा निकाल त्या आधी नक्की दिला जाईल.

खंडपीठावरील न्या. गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण न्या. एस. अब्दुल नझीर यांनी सुनावणी बुधवारी सायंकाळी पाच वाजता संपविण्यात येईल, असे जाहीर केले. त्यानंतर सर्व पक्षकारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मागण्या पूर्णांशाने मान्य न झाल्यास पर्यायी निकाल काय दिला जाऊ शकतो, याविषयीचे म्हणणे सर्वांनी तीन दिवसांत सादर करावे, असे न्यायालयाने सांगितले.

अयोध्येतील २.७७ हेक्टर जागेवरील बाबरी मशिदीच्या जागेच्या मालकी हक्काचा हा वाद आहे. यासंबंधी हिंदू व मुस्लीम पक्षकारांनी केलेले पाच दिवाणी दावे अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले आणि जागेची रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ बोर्ड या तिघांमध्ये समान वाटणी करण्याचा निर्णय २०१० मध्ये झाला. त्याविरुद्धच्या १४ अपिलांची सुनावणी झाली. ६ आॅगस्टपासून सलग ४० दिवस झालेली ही सुनावणी झाली.मालकी हक्काविषयीच्या दिवाणी अपिलांप्रमाणेच ही अपिले असल्यानेदोन वा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी शक्य होती, पण विषयाचे महत्त्व, इतिहास, त्यावरून घडलेल्या घटना व राजकीय संदर्भ हे विचारात घेऊन सरन्यायाधीश गोगोई यांनी हे प्रकरण स्वत: हाती घेण्याचे ठरविले. प्रथा मोडून त्यांनी सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे विशेष न्यायपीठही स्थापन केले. सुनावणी व निकालपत्र तयार करून ते जाहीर करणे हे काम सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या आधी पूर्ण व्हावे यासाठी अन्य सर्व कामे बाजूला ठेवण्यात आली.

प्रकरण अंतिम सुनावणीस घेतानाच, आपण निकाल देण्यापेक्षा तडजोडीने वाद मिटत असेल तर पाहावा या हेतूने न्यायालयाने मध्यस्थमंडळ नेमले. साक्षी-पुराव्यांच्या हजारो पानी कागदपत्रांचे भाषांतर पूर्ण होईपर्यंतच्या दोन महिन्यांच्या काळात या मंडळाने फैजाबादमध्ये सर्व पक्षांचे म्हणणे एकून घेतले. परंतु तडजोडीने वाद मिटण्याची शक्यता नाही, असे त्यांनी कळविल्यानंतर सुनावणी सुरू झाली. ती पूर्ण होईपर्यंतही मध्यस्थ मंडळाचा मार्ग खुला ठवला होता. मात्र कोणीच पक्षकार तडजोडीस तयार नसल्याने सर्वोच्च न्यायनिवाडा हाच मार्ग शिल्लक राहिला.

वार्तांकनाबाबत न्यूज चॅनेल्सना एनबीएसएच्या सूचनान्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्डस् अथॉरिटीने (एनबीएसए) सर्व न्यूज चॅनेल्सना या प्रकरणाच्या वार्तांकनाबाबत काही सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल काय असेल, याचा अंदाज मांडला जाऊ नये, केवळ सुनावणीसंदर्भातील बाबी दाखविल्या जाव्यात, चॅनेल्सवर बाबरी मशीद पाडल्याचे फुटेज दाखवले जाऊ नये, कोणत्याही स्थितीत कुणाच्याही विजयाची दृश्ये प्रसारित केली जाऊ नयेत, चॅनेलवरील वादविवाद कार्यक्रमात कोणाकडूनही जहाल मते मांडली जाऊ नयेत, असेही एनबीएसएने सूचनांमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरHigh Courtउच्च न्यायालय