शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतही आता विमानासारखी यंत्रणा, अपघाताचं कारण कळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 07:43 IST

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होणार

नवी दिल्ली: रेल्वेतही आता विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्सचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजण्यास मदत होईल. याशिवाय मोटरमनचं कामदेखील अधिक सोपं होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच रेल्वे गाड्यांमध्ये लोको कॅब व्हॉईस रेकॉर्डिंग (एलसीव्हीआर) यंत्र लावण्यात येईल. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं सोमवारी याबद्दलची माहिती दिली. व्हॉईस रेकॉर्डर सर्वसाधारणपणे ब्लॅक बॉक्स नावानं ओळखला जातो. रेल्वेकडून सध्या या प्रणालीवर काम सुरू आहे. ब्लॅक बॉक्समुळे रेल्वे इंजिनासह विविध घटकांची माहिती रेकॉर्ड होऊ शकते. यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आणि आकडेवारी रेल्वे अधिकाऱ्यांना मिळेल. त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण शोधण्यात मोठी मदत होईल. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून पावलं उचलणं सोपं होऊ शकतं. अनेक मानवी आणि तांत्रिक चुका रेकॉर्ड करण्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावतो. आताच्या घडीला विमानांमध्ये ब्लॅक बॉक्सचा वापर होतो. यामध्ये दोन वेगवेगळी उपकरणं असतात. यातील एकात उड्डाणासंदर्भातील आकडेवारीची नोंद होते. तर दुसऱ्या उपकरणात कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड होतो. ब्लॅक बॉक्स विमानाच्या मागील बाजूस असतो. ब्लॅक बॉक्सचं आवरण अतिशय मजबूत स्टिल किंवा टायटेनियमपासून तयार करण्यात येतं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यास ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. कितीही मोठा दाब सहन करु शकेल, अशी त्याची रचना असते. विमान अपघातांचं कारण शोधण्यात ब्लॅक बॉक्सनं अनेकदा महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेairplaneविमानAccidentअपघात