आता मी ८० वर्षांचा झालो, निवडणूक लढविणार नाही, येडियुरप्पा यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 08:00 IST2023-02-01T07:44:35+5:302023-02-01T08:00:16+5:30
B S Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

आता मी ८० वर्षांचा झालो, निवडणूक लढविणार नाही, येडियुरप्पा यांची मोठी घोषणा
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसून भविष्यातही निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी आता ८० वर्षांचा झालो आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही, असे येडियुरप्पा म्हणाले. राजकारणात सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२४ मध्ये मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याचे माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
‘मुलगा राजकारणात...
येडियुरप्पा यांना त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना कर्नाटकच्या राजकारणात उतरवायचे आहे, असे मानले जाते. विजयेंद्र हे शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे येडियुरप्पांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, नंतर पक्ष यावर अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
येडियुरप्पांचा पाठिंबा का आवश्यक?
ते लिंगायत समुदायाचे दिग्गज नेते आहेत. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाकडे त्यांच्या उंचीचा नेता नाही. येडियुरप्पा यांनी भाजपची कोंडी केली तर पक्षाला मोठे नुकसान होईल.