आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 00:22 IST2026-04-06T00:20:19+5:302026-04-06T00:22:01+5:30

गोदामांमधून होणारी सिलेंडर विक्री राजधानी दिल्लीत थांबवण्यात आली आहे. दिल्ली सरकारने रविवारी हा निर्णय घेतला आहे.

Now cylinder sale from warehouses is stopped, action will be taken against those who break the rules; Delhi government's decision | आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय

आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय

एलपीजी सिलेंडर वितरण सुरळीत सुरू रहावे यासाठी दिल्ली सरकारने गोदामांमधून होणारी सिलेंडर विक्री बंद केली आहे. दिल्लीमुख्यमंत्री कार्यालयाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. सर्व सिलेंडर वितरकांना आदेश देण्यात आले आहेत की, अशा प्रकारे सिलेंडर विक्री बेकायदेशीर असेल आणि असे आढळून आले तर कारवाई केली जाईल. 

दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयाबद्दल सांगण्यात आले की, एलजीपीची वितरण व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत राहावी यासाठी गोडाऊनमधून होणारी सिलेंडरची विक्री बंद केली आहे. त्यामुळे यापुढे गोदामांमधून सिलेंडर मिळणार नाही. 

नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून ५ किलो वजनाच्या सिलेंडरची संख्या वाढवण्यात आली आहे. आता ओळखपत्र दाखवून हे छोटे सिलेंडर सहजपणे नागरिक घेऊ शकणार आहेत. त्यासाठी कोणत्याही पडताळणीची गरज पडणार नाही. 

विशेषतः स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी एचपीसीएलच्या निवडक विक्री केंद्रांवर ११ मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. तिथे एलपीजी वितरकांची माहिती दिली जात आहे. लोकांना आवाहन केले जात आहे की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 

Web Title : दिल्ली में गोदामों से सिलेंडर की बिक्री बंद, उल्लंघन करने पर होगी कार्रवाई

Web Summary : दिल्ली सरकार ने एलपीजी सिलेंडर वितरण को सुव्यवस्थित करने के लिए गोदामों से बिक्री पर रोक लगाई। उल्लंघन करने वालों पर कार्रवाई होगी। 5 किलो के सिलेंडर की उपलब्धता बढ़ी। एचपीसीएल हेल्प डेस्क प्रवासी मजदूरों को वितरण जानकारी दे रहे हैं, अफवाहों से बचने का आग्रह किया गया।

Web Title : Delhi Bans Cylinder Sales From Warehouses, Strict Action to Follow

Web Summary : Delhi government bans LPG cylinder sales from warehouses to streamline distribution. Violators will face action. Increased availability of 5kg cylinders simplifies access. HPCL help desks aid migrant workers with distribution information, urging people to avoid rumors.