शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गेहलोत केंद्र सरकारशी दोन हात करण्याच्या तयारीत?; राजस्थानात तपासासाठी CBIला घ्यावी लागेल परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:17 IST

राजस्थानात राजकीय पेच सुरू असतानाच गेहलोत सरकारने सीबीआयसंदर्भात हा निर्णय गेतला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोतांनी, दबाव टाकण्यासाठी सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता.

ठळक मुद्देसीबीआयला राजस्थानमध्ये कुठल्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री गहलोत म्हणाले होते, देशात आज गुंडगिरी सुरू आहे. मनाला वाटेल तसे छापे टाकले जात आहेत.सीबीआयच्या प्रवेशावर बंदी घालणारे राजस्थान चौथे राज्य

जयपूर -राजस्थानात राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या गेहलोत सरकारने आता थेट केंद्र सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. गेहलोत सरकारने सीबीआयसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता, सीबीआयला राजस्थानमध्ये कुठल्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात राज्याच्या गृह मंत्रालयाने अधिसूचनादेखील जारी केली आहे.

सीबीआय थेट कुठल्याही प्रकरणाचा तपास करू शकणार नाही. जर सीबीआयकडे 1990 पूर्वीचे एखादे प्रकरण असेल, तर त्यांना त्या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची सहमती घ्यावी लागेल, असे राजस्थानच्या गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हणण्यात आले आहे. 

राजस्थानात राजकीय पेच सुरू असतानाच गेहलोत सरकारने सीबीआयसंदर्भात हा निर्णय गेतला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोतांनी, दबाव टाकण्यासाठी सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला होता.

मुख्यमंत्री गहलोत म्हणाले होते, देशात आज गुंडगिरी सुरू आहे. मनाला वाटेल तसे छापे टाकले जात आहेत. मला दोन दिवसांपूर्वीच समजले होते, की माझ्या निकटवर्तीयांवर छापे पडणार. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य राजस्थान काँग्रेसच्या काही नेत्यांच्या ठिकानांवर आयकर विभागाने केलेल्या छापेमारीनंतर आले होते. राजस्थान राजीव अरोडा आणि धर्मेंद्र राठोड या दोन काँग्रेस नेत्यांच्या ठिकानांवर हे छापे पडले होते. 

सीबीआयच्या प्रवेशावर बंदी घालणारे चौथे राज्य राजस्थान -राजस्थान हे सीबीआयच्या प्रवेशावर बंदी घालणारे चौथे राज्य ठरले आहे. यापूर्वी छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालने, एखाद्या प्रकरणात थेट तपासासाठी सीबीआयला बंदी घातली होती. आता या राज्यांमध्ये एखाद्या प्रकरणासंदर्भात सीबीआयला तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Rajasthanराजस्थानCBIगुन्हा अन्वेषण विभागAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेस