शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना, २० राज्यांतील ९१ मतदारसंघांत ११ एप्रिलला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 6:06 AM

देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.

नवी दिल्ली - देशातील २० राज्यांतल्या ९१ मतदारसंघांत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होणार असून, त्या संदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली.या निवडणुकांत केंद्रातील सत्ता टिकविण्याचा भाजपाकडून, तर त्या पक्षाला हरविण्याचे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याबाबतची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी केलेली अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. निवडणुका होऊ घातलेल्या मतदारसंघांमध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून, ती २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्जांची २६ मार्च रोजी छाननी होईल. त्यानंतर, २८ मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. त्या दिवशी संध्याकाळी ९१ लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची एकूण संख्या किती आहे, ते कळू शकेल.लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश (२५), अरुणाचल प्रदेश (२), आसाम (५), बिहार (४), छत्तीसगड (१), जम्मू-काश्मीर (२), महाराष्ट्र (७), मणिपूर (१), मेघालय (२), मिझोरम (१), नागालँड (१), ओडिशा (४), सिक्किम (१), तेलंगणा (१७), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), उत्तराखंड (५), पश्चिम बंगाल (२), अंदमान आणि निकोबार बेटे (१), लक्षद्वीप (१) या ठिकाणी मतदान होणार आहे.तेलंगणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातहैदराबाद : लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिलला मतदान होत आहे. तेलंगणामध्ये सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यात उमेदवारांचे अर्ज २५ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येतील.डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांत दणदणीत विजय मिळविल्यानंतर, त्याचीच पुनरावृत्ती आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाला वाटत आहे. राज्यात लोकसभेच्या १७ जागा असून, त्यापैकी १६ जागा टीआरएस लढविणार असून, एक जागा एआयएमआयएम या मित्रपक्षाला देण्यात आली आहे.टीआरएसचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी करीमनगर येथून प्रचारमोहिमेचा प्रारंभ केला. ते म्हणाले की, भाजपा व काँग्रेसने जनतेच्या भल्यासाठी काहीही भरीव काम केलेले नाही. या दोन पक्षांचा मुकाबला करण्यासाठी देशात पर्यायी संघराज्य राजकारण अस्तित्वात आले पाहिजे. त्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशामध्ये वेगाने सुधारणा घडविण्यासाठी वेळप्रसंगी राष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. मात्र, टीआरएसने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. डाव्या पक्षांचे काही आमदार गेल्या काही महिन्यांत टीआरएसमध्ये गेल्यामुळे ते पक्ष काहीसे हताश आहेत. (वृत्तसंस्था)एमआयएम आघाडीआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी हैदराबादमधून उमेदवारी दाखल केली. दुर्बल, वंचित गटांचा आवाज हैदराबादमधून बुलंद केला जातो. यापुढेही हे कार्य आम्ही असेच सुरूच ठेवू, असे ओवेसी म्हणाले. २००४ सालापासून ते हैदराबादमधून सातत्याने लोकसभेवर निवडून येत आहेत. टीआरएसने एआयएमआयएमला पाठिंबा जाहीर केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndiaभारत