वधू-वराला घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पियोवर जीपमधून उधळल्या नोटा, रस्त्यावर पडला नोटांचा खच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:46 IST2026-03-13T17:46:11+5:302026-03-13T17:46:47+5:30

Punjab Wedding News: आता विवाह सोहळ्यांमध्ये प्री वेडिंग फोटोशूटपासून ते वरातीपर्यंत मोठ्या प्रमाावर पैसे खर्च केले जातात. हे कमी म्हणून की काय वरातीमध्ये वधू वरांवर नोटांची उधळण केली जाते. दरम्यान पंजामधील भटिंडा येथे वधू-वराला घेऊन जाणाऱ्या वरातीमधील स्कॉर्पियोवर ओपन जीपमधून नोटांची उधळण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Notes spilled from the Scorpio jeep carrying the bride and groom, leaving a trail of notes on the road. | वधू-वराला घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पियोवर जीपमधून उधळल्या नोटा, रस्त्यावर पडला नोटांचा खच  

वधू-वराला घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पियोवर जीपमधून उधळल्या नोटा, रस्त्यावर पडला नोटांचा खच  

हल्लीच्या काळात विवाह सोहळ्यांना मोठ्या प्रमाणावर इव्हेंटबाजी आणि भपकेबाजपणाचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे आता विवाह सोहळ्यांमध्ये प्री वेडिंग फोटोशूटपासून ते वरातीपर्यंत मोठ्या प्रमाावर पैसे खर्च केले जातात. हे कमी म्हणून की काय वरातीमध्ये वधू वरांवर नोटांची उधळण केली जाते. दरम्यान पंजामधील भटिंडा येथे वधू-वराला घेऊन जाणाऱ्या वरातीमधील स्कॉर्पियोवर ओपन जीपमधून नोटांची उधळण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

ज्या स्कॉर्पियोवर नोटांची उधळण करण्यात आली तिचा नोंदणी क्रमांक हा हरयाणामधील होता. तर ओपन जीपवरील नोंदणी क्रमांक हा पंजाबमधील होता. दरम्यान, वधू आणि वर बसलेल्या स्कॉर्पियोवर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा उधळण्यात आल्या की ज्यामुळे रस्त्यावर नोटांचा खच पडला. तसेच वधू वरांना घेऊन वरात पुढे निघून गेली. मात्र नोटांची ही उधळण पाहून तिथे उपस्थित असलेले सारेच लोक अवाक् झाले.

दरम्यान, वरातीत झालेल्या या पैशांच्या उधळणीचा व्हिडीओ एका व्यक्तीने चित्रित केला. तसेच नंतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ बघता बघता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. तसेच यावर आता नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण ही अपघाताला निमंत्रण देणारी कृती असल्याची टीका करत आहेत. तर काही जण ही पंजाब हरयाणामधील परंपरा असल्याचे सांगत या नौटांच्या उधळणीचे समर्थन करत आहे.  

Web Title : विवाह में नोटों की बारिश: पंजाब में दूल्हे की स्कोर्पियो पर उड़े नोट

Web Summary : पंजाब में एक विवाह जुलूस में दूल्हे की स्कोर्पियो पर खुली जीप से नोटों की बारिश की गई, जिससे सड़क पर पैसे बिखर गए। इस दृश्य को फिल्माया गया और ऑनलाइन साझा किया गया, जिससे मिली-जुली प्रतिक्रियाएं आईं। कुछ ने इसे खतरनाक बताया, जबकि अन्य ने इसे परंपरा बताते हुए बचाव किया।

Web Title : Wedding Procession Rains Money: Scorpio Showered with Notes in Punjab

Web Summary : In Punjab, a wedding procession featured a Scorpio showered with currency notes from an open jeep, leaving a trail of money. The spectacle, filmed and shared online, sparked mixed reactions, with some criticizing it as dangerous and others defending it as tradition.