शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

पंतप्रधानपदावर काँग्रेसचा दावा; 24 तासांत केलं घुमजाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 11:56 AM

काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर निकालानंतरच्या राजकारणावर चर्चा रंगू लागली आहे. लोकसभा निकालांमध्ये भाजपाला कमी जागा मिळाल्या तर विरोधी पक्षांची एकजूट करुन पंतप्रधानपदावर दावा केला जाऊ शकतो. काँग्रेसने इतर पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल, एनडीए हटवणं आमचे लक्ष्य असल्याचं विधान केलं होतं. मात्र 24 तासाच्या आत काँग्रेसने या विधानावर घुमजाव केले आहे. 

काँग्रेसने पंतप्रधानपदात आम्हाला स्वारस्य नाही असंही कधीही सांगितले नाही. काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा आणि जुना राजकीय पक्ष आहे. जर पाच वर्षे सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसला संधी दिली पाहिजे असं विधान काँग्रेसचे नेते गुलाब नबी आझाद यांनी करुन स्वत:च्या विधानावरुन पलटी मारली आहे. 

यावेळी बोलताना गुलाब नबी आझाद म्हणाले की, निवडणुकीच्या या काळात विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदावरुन कोणताही वाद उपस्थित करता कामा नये. पंतप्रधानपदाचा निर्णय सर्वसमंतीने होईल. मात्र राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत असं त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या शक्यतेमुळे मतमोजणीच्या दिवशी, २३ मे रोजी सोनिया गांधी यांनी भाजपबरोबर नसलेल्या आणि त्याचबरोबर यूपीएचे घटक असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. निवडणूक निकालांपूर्वीच ही मोर्चेबांधणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाबाबत चर्चा केली जाईल. 

मागील आठवड्यातही कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईल असं विधान केलं होतं. त्यामुळे 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटलं होतं. तर शरद पवार यांनीही मोदींचं सरकार फक्त 13 दिवस टिकेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था 1996मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असं सांगितलं आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. 21 मे रोजी त्याला मूर्त स्वरूप येणार असल्याचंही पवार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेस