शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
4
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
5
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
6
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
7
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
8
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
9
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
10
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
11
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
12
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
13
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
14
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
15
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
16
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
17
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
18
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
19
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

काही देणंघेणं नाही! शरद पवारांच्या बैठकीआधीच स्पष्टीकरण; सस्पेन्स वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 12:57 IST

दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी आज भाजप विरोधी पक्षांची बैठक; काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नाही

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार मिशन २०२४ साठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र आता याबद्दल राष्ट्रमंचाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूलचे नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रमंचची स्थापना केली आहे. याच राष्ट्रमंचच्या माध्यमातून शरद पवारांच्या निवासस्थानी दिल्लीत भाजप विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली असताना राष्ट्रमंचाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'लोकसभेच्या २०२४ मध्ये होत असलेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपला आव्हान देण्याच्या हेतूनं तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी ही बैठक होत नाहीए,' असं स्पष्टीकरण राष्ट्रमंचाकडून देण्यात आलं आहे.प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले...

शरद पवारांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला वरिष्ठ वकील के. टी. एस. तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी राजदूत के. सी. सिंह, गीतकार जावेद अख्तर, वरिष्ठ पत्रकार करण थापर, आशुतोष उपस्थित राहणार आहेत. 

शरद पवारांच्या बैठकीआधी काय म्हणाले प्रशांत किशोर?प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात काल दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती.  लोकसभेच्या पुढील निवडणुकीसाटी पवार तिसरी आघाडी तयार आहेत का, अशी चर्चा या बैठकीनंतर जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी