शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी...कसे होणार?, शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 11:16 IST

सरासरीपेक्षा १० टक्के पाणी कमी

नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचला असतानाही देशातील धरणे अद्याप पूर्ण भरलेली नसल्याने चिंता वाढली आहे. केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे.

जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये जलसाठ्यामध्ये विक्रमी वाढ झाली होती; मात्र ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नव्याने पाणीच आले नाही. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. अशा स्थितीत येत्या काही महिन्यांत पाणीटंचाई जाणवू शकते. ‘अल निनो’चा परिणाम पावसावर दिसून आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रब्बी पिकांना धोकापावसाचा तुडवडा आणि वाढत्या उष्णतेमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरील ताण आणखी वाढणहर आहे. धरणे कोरडी पडल्याने अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचे संकटही निर्माण होऊ शकते.

१२२ वर्षांत सर्वांत कमी पाऊसयंदा १२२ वर्षांतील सर्वांत कमी पावसाची नोंद ऑगस्टमध्ये झाली आहे. ऑगस्ट महिना ऐतिहासिकदृष्ट्या कोरडा राहिला. या महिन्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा किती? :

ऑगस्ट अखेरीस देशातील १५० धरणांमध्ये ११३.४१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) होता. गेल्यावर्षी या धरणांमध्ये १४६.८२८ बीसीएम जलसाठा होता. गेल्या १० वर्षांची सरासरी साठा पातळी १२५.११७ बीसीएम आहे.

या राज्यांत धरणे रिकामी

महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू.

उत्तर भाग : हिमाचल, पंजाब, राजस्थानपूर्व क्षेत्र : त्रिपुरा, ओडिशा, झारखंड, प.बंगालपश्चिमी क्षेत्र : गुजरात आणि महाराष्ट्रमध्य क्षेत्र : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडदक्षिण क्षेत्र : आंध्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू

 

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरणIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र