खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 21:32 IST2023-04-28T21:32:05+5:302023-04-28T21:32:31+5:30
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला.

खर्गेच नाही, गांधी कुटुंबियालाच मोदींचा अपमान करण्याची सवय; अमित शाहनी कर्नाटकात राग छेडला
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत आता रंगत येऊ लागली आहे. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दावणगिरीमध्ये शुक्रवारी काँग्रेसवर जोरदार वार केला. कर्नाटकात काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेत आली तेव्हा त्यांना गरीबांची चिंता नव्हती, असा आरोप शाह यांनी केला आहे.
काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा कर्नाटकात सत्तेत आला तेव्हा तेव्हा त्यांनी इथल्या गरिबांची चिंता केली नाही. शेतकऱ्यांची चिंता केली नाही. विकासाची चिंता केली नाही. कर्नाटकच्या सुरक्षेची चिंता केली नाही, अशी टीका शाह यांनी केली. काँग्रेसला फक्त आणि फक्त एटीएम बनून दिल्लीला पैसे पाठवण्याची चिंता होती, भाजपाने सत्तेत आल्यावर दरवेळी कर्नाटकच्या विकासाची आणि सुरक्षेची चिंता केली, असे शाह म्हणाले.
काँग्रेसने पीएफआय कार्यकर्त्यांना मोकळे सोडले आहे. यामुळे त्यांच्या राजवटीत हत्या आणि बॉम्बस्फोट झाले. पंतप्रधान मोदींनी पीएफआयवर बंदी घातली आणि 95 हून अधिक नेत्यांना तुरुंगात पाठवले. त्यामुळे कर्नाटक सुरक्षित झाले, असे मोदी म्हणाले.
काँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान केला. ना शेतमालाला रास्त भाव मिळाला, ना खत मिळाले, ना पाणी मिळाले. आज भाजपाच्या डबल इंजिन सरकारमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्याचे काम झाले. गरिबांना प्रत्येक सुविधा देण्याचे काम केले, असे शाह म्हणाले.