शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

थोडेथोडके नाहीत, 30 काँग्रेसचे आणि काही अपक्ष आमदार सचिन पायलटांच्या गटात; आमदारकी वाचणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 21:09 IST

Rajasthan political crisis: पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. 

जयपूर : राजस्थानमध्येकाँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री सचिन पायलटांच्या गोटात थोडेथोडके नाही तर 30 काँग्रेसचे आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत. यामुळे जर पायलट काँग्रेसमधून बाहेर पडल्यास नियमाप्रमाणे कोणाच्याही आमदारकीला धक्का लागणार नसल्याची चिन्हे आहेत. (Rajasthan political crisis)

सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या गटामध्ये काँग्रेसचे 30 आमदार आणि अन्य काही अपक्ष आमदार असल्याचे खात्रलायक वृत्त एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. पायलट जो निर्णय घेतील त्यांना आपला पाठिंबा असल्याचे या आमदारांनी कळविले आहे. यामुळे गेहलोत सरकारवर टांगती तलवार असून काही वेळातच राजस्थानमध्ये आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. 

काय परिस्थिती?राजस्थान विधानसभेमध्ये काँग्रेसला 107 जागांवर बहुमत आहे. याशिवाय 13 अपक्ष आणि एक राष्ट्रीय लोकदलाचे आमदारांचे समर्थन आहे. यामुळे गेहलोत सरकारकडे 121 आमदारांचे समर्थन आहे. तर भाजपाकडे 72 आमदार असून बहुमतासाठी 29 आमदारांची गरज आहे. विधानसभेत बहुमतासाठी 101 मते हवी आहेत. जर पायलट 30 पेक्षा जास्त आमदार फोडण्यात यशस्वी झाले तर त्यांना 1/3 आमदार गोळा करण्यासाठी काहीच काँग्रेसच्या आमदारांची गरज भासणार आहे. काही आमदार तळ्यात मळ्यात आहेत. यामुळे जर हा आकडा गाठल्यास कर्नाटक, मध्य प्रदेशप्रमाणे आमदारकी गमवावी लागणार नाही. 

ज्योतिरादित्य शिंदे मदतीला?

कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक मोठे राज्य जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan political crisis) शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उप मुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. नाराज असलेल्या पायलटांना त्यांचे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. शिंदे यांनी पायलट यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामुळे राजस्थानमध्येही सत्तापालट अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट करत काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ''माझे जुने साथीदार राहिलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून डावलले जात आहे. हे पाहून मी दु:खी आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नसल्याचे स्पष्ट होत आहे., असे ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस, सचिन पायलट आणि गेहलोत यांना टॅग केले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

Rajasthan political crisis: पक्ष सुटला पण दोस्ती कायम; काँग्रेसविरोधात सचिन पायलटांना ज्योतिरादित्यांच थेट 'बळ'

हार्दिक पटेलांनी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होताच उत्साहात ट्विट केले; ट्रोल झाले

गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा