शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:39 IST

पहलगाम हल्ल्यात ३ नव्हे, तर ४ दहशतवादी थेट सामील होते. चौथ्या दहशतवाद्याची भूमिकाही तपासात उघड झाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचा सहभाग समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात असे म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यात ३ नव्हे, तर ४ दहशतवादी थेट सामील होते. चौथ्या दहशतवाद्याची भूमिकाही तपासात उघड झाली आहे, तो दहशतवादी फारूक अहमद तडवा आहे.

बीबीसी उर्दूने तपास अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, फारूक हल्ल्याच्या दिवशी पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होता. जोपर्यंत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धुमाकूळ घातला होता, तोपर्यंत फारूक पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय होता. तडवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून पहलगाम हल्ल्यातील रक्तपात बघत होता.

तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारीपहलगाम हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली होती. यामध्ये आदिल हुसैन टोकर (अनंतनाग), हाशिम मूसा आणि अली भाई यांच्या नावांचा समावेश होता. हाशिम मूसा हा पहलगाम हल्ल्याचा मुख्य हल्लेखोर होता. मूसा हा पाकिस्तानी सैन्यात जवान म्हणूनही काम करत होता.

बसरण घाटात गोळीबार करण्यापूर्वी, मूसा आणि त्याच्या साथीदारांनी एका ठिकाणी आश्रय घेतला होता. तपास यंत्रणेने आश्रय देणाऱ्या दोन स्थानिक व्यक्तींनाही अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

लष्कर-ए-तैयबाने रचला होता कट, मुख्यालय उद्ध्वस्त!पहलगाम हल्ल्याचा कट लष्कर-ए-तैयबाने रचला होता. हाफिज सईद, पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर यंत्रणा यांनी एकत्र येऊन हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला होता.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने लष्कर आणि जैशच्या दहशतवादी ठिकाणांचा विध्वंस केला होता. लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथे होते, ज्यावर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ला केला. पहलगाम हल्ल्यापासून लष्करचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश प्रमुख मसूद अझर भूमिगत आहेत.

कोण आहे फारूक अहमद तडवा?लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फारूकचे घर जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी फारूक कुपवाडा सोडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतरित झाला होता. त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, त्याने १९९०मध्येच घर सोडले होते. तडवा सध्या लष्करचा कमांडर आहे. तडवा यापूर्वीही खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर