शेतकऱ्यांना १२ नव्हे ६ हजारच : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 07:50 AM2024-02-07T07:50:42+5:302024-02-07T07:51:12+5:30

सरकार म्हणते, रक्कम वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही

Not 12, but 6,000 to farmers: Central government's explanation | शेतकऱ्यांना १२ नव्हे ६ हजारच : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना १२ नव्हे ६ हजारच : केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटर्व
नवी दिल्ली : पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ६,००० रुपयांवरून ८,००० ते १२,००० रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. २०१९ मध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत २.८१ लाख कोटी रुपये वितरित

nयोजनेंतर्गत झालेल्या प्रगतीची माहिती देताना मंत्री म्हणाले की, सरकारने आतापर्यंत ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ हप्त्यांमध्ये २.८१ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.
nजमीन धारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा लाभ दिला जातो.  पीएम-किसान ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनांपैकी एक आहे.
nशेतकरी-केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय या योजनेचे लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची खात्री झाली आहे, असेही मुंडा म्हणाले.

Web Title: Not 12, but 6,000 to farmers: Central government's explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.