शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

आता रेल्वेमध्ये गांधी जयंती दिवशी मिळणार नाही मांसाहारी जेवण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 6:47 PM

अहिंसेचे पूजारी असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी रेल्वेमध्ये प्रवास करताना आता तुम्हाला शाकाहारी जेवणावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली - अहिंसेचे पूजारी असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी रेल्वेमध्ये प्रवास करताना आता तुम्हाला शाकाहारी जेवणावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. गांधी जयंती दिवशी रेल्वेमध्ये मांसाहारी जेवण देण्यात येऊ नये अशी शिफारस रेल्वे मंत्रालयाने सरकारला केली आहे. 2018-19 हे वर्ष महात्मा गांधींजींच्या जन्माचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. या दरम्यान रेल्वेमंत्रालयाने गांधी जयंती हा दिवस स्वच्छता दिनासोबतच शाकाहार दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी केली आहे. गांधीजी स्वत: शाकाहारी होते. त्यांना मांसाहाराचा तिटकारा होता. शाकाहारी होऊन हिंसा टाळली पाहिजे, असे त्यांचे मत होते, असे कारण समोर करत रेल्वेने पुढची तीन वर्षे गांधी जयंती दिवशी रेल्वेमध्ये मांसाहार देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.  तसेच गांधी जयंती दिवशी गांधीजींच्या विचारांचा संदेश देणाऱ्या गाड्या चालवण्यात याव्यात, दांडी येथील सत्याग्रहाची आठवण म्हणून एक विशेष गाडी सोडावी, असा प्रस्तावही रेल्वेने पाठवला आहे. दरम्यान, केंद्राकडून हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndian Railwayभारतीय रेल्वेfoodअन्न