नॉन-स्टिक भांड्यांमुळे कर्करोगाचा धोका : डॉ. अजित गोपछडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:03 IST2026-01-30T10:02:50+5:302026-01-30T10:03:58+5:30
Health News: नॉन-स्टिक कुकवेअर व प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या वस्तूंमुळे जीवघेण्या आजारांचा धोका वाढला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली.

नॉन-स्टिक भांड्यांमुळे कर्करोगाचा धोका : डॉ. अजित गोपछडे
नवी दिल्ली - नॉन-स्टिक कुकवेअर व प्लास्टिकमध्ये पॅक केलेल्या वस्तूंमुळे जीवघेण्या आजारांचा धोका वाढला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली.
गुरुवारी शून्य प्रहरात नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित करीत डॉ. गोपछडे यांनी नॉन-स्टिक कुकवेअर, काळ्या प्लास्टिकची भांडी व प्लास्टिक पॅकेजिंगने निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. केंद्राने याकडे लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्यासाठी पावले उचलण्याची मागणी डॉ. गोपछडे यांनी केली आहे.