non-Hindus will now have to give 'Aadhaar' for garba and dandiya | ...म्हणून आता हिंदू नसलेल्यांना द्यावा लागणार 'आधार'
...म्हणून आता हिंदू नसलेल्यांना द्यावा लागणार 'आधार'

हैदराबादः गरबा आणि दांडियामध्ये सहभागी होण्यासाठी आता आधार तपासलं जाणार आहे. गरबा-दांडियाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना हिंदू नसलेल्यांचं आधार कार्ड तपासण्याचे आदेश बजरंग दलानं दिले आहेत. बजरंग दलानं सांगितलं की, हिंदू नसलेल्यांची ओळख पटवण्यासाठी आता दांडियामध्ये प्रवेश करणाऱ्यांना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

बजरंग दलानं गरबा आणि दांडियाचं आयोजन करणाऱ्या आयोजकांना एक पत्र लिहिलं आहे. पत्रात ते लिहितात, गेल्या काही वर्षांपासून हिंदू नसलेले लोक गरबा आणि दांडियामध्ये प्रवेश करून महिलांबरोबर छेडछाड करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. तसेच जे लोक पीडितांच्या बचावासाठी पुढे येतात, त्यांना हे हिंदू नसलेले लोक मारहाणही करतात.

बजरंग दलाच्या मते, गरबा आणि दांडियाचे आयोजक हिंदू नसलेल्या बाऊंसरना कामावर ठेवत आहेत. त्या बाऊंसरमुळेच हिंदू नसलेल्या लोकांना गरबा आणि दांडियामध्ये प्रवेश मिळतो. तसेच आयोजक अशा समारंभांच्या सुरक्षेकडे फारसं लक्ष देत नसल्याचंही बजरंग दलानं म्हटलं आहे. 


Web Title: non-Hindus will now have to give 'Aadhaar' for garba and dandiya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.