शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

राहुल गांधींच्या व्हिडिओवरुन दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये बाचाबाची; न्यूज अँकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:49 IST

राहुल गांधी वायनाडमधील घटनेबाबत बोलले होते, पण त्याचा संदर्भ उदयपूर हत्येशी जोडून दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणी चॅनेलने माफीदेखील मागितली.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधील व्हिडिओ उदयपूरच्या घटनेशी जोडल्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. याप्रकरणी हिंदी वृत्त वाहिनी झी टीव्हीचा न्यूज अँकर रोहित रंजन यांना मंगळवारी नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले. चॅनलने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडिओबद्दल चॅनलने माफीही मागितली होती.

सीएम योगींना टॅग केलेदरम्यान, सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये जोरदार वादावादी आणि धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. छत्तीसगड पोलिस टीव्ही अँकरला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, तर गाझियाबादध्ये पोलीस त्या अँकरला दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस घरात दाखल झाल्यानंतर अंकरने सीएम योगी आदित्यनाथ, एसएसपी गाझियाबाद आणि एडीजी लखनऊ यांना टॅग करत ट्विट केले होते की, 'छत्तीसगड पोलिस स्थानिक पोलिसांना न कळवता मला अटक करण्यासाठी माझ्या घरी दाखल झाले आहेत, हे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का?'

पोलिसांनी अटक वॉरंटही दाखवलेत्यावर छत्तीसगड पोलिसांनी उत्तर दिले की, जर वॉरंट असेल तर कोणालाही माहिती देण्याची गरज नाही. रायपूर पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'माहितीचा असा कोणताही नियम नाही. मात्र, आता युपी पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलीस पथकाने तुम्हाला न्यायालयाचे अटक वॉरंटही दाखवले. तुम्ही त्यांना सहकार्य करावे, तपासात सहभागी व्हावे आणि न्यायालयात आपली बाजू मांडावी.' दरम्यान, या सर्व गोंधळात अँकरला अटकेपासून वाचवण्यासाठी गाझियाबाद पोलिसांनी त्यांना सोबत घेतले. सध्या ते यूपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्यावर सामान्य कलमे लावण्यात आली आहेत.

नेमकं काय प्रकरण आहे?केरळमधील वायनाड येथे राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तरुणांना उद्देशून राहुल गांधी बोलले होते. ते म्हणाले होते की, 'त्या मुलांना माफ करा.' पण, त्या वक्तव्याचा संबंध उदयपूरच्या हत्येतील आरोपींशी जोडण्यात आला. अँकर रोहित रंजन यांनी तो दिशाभूल करणारा व्हिडिओ चॅनलवर चालवला. यानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अँकरवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ राज्यवर्धन राठौर सारख्या भाजप नेत्यांनीही शेअर केला होता, त्यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

चॅनलने माफी मागितलीया गोंधळानंतर चॅनलने माफीदेखील मागितली होती. रंजन आपल्या शोमध्ये म्हणाले, 'काल आमच्या शोमध्ये उदयपूरच्या घटनेला जोडून राहुल गांधींचे विधान चुकीच्या संदर्भात दाखवण्यात आले होते, ही एक मानवी चूक होती ज्यासाठी आमची टीम माफी मागते.' चॅनेलने माफी मागितली, पण सध्या पोलीस टीव्ही अँकरला अटक करण्यासाठी आले आहेत. यावरुन दोन राज्यांची पोलीस आमने-सामने आले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस