शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलिंगसाठी घरी बोलवायचे अन्...; नोएडातल्या जोडप्याने शेकडो मुलींना करायला लावलं अश्लील काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:40 IST

नोएडात अश्लील व्हिडीओचे रॅकेट चालवणाऱ्या जोडप्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

Noida Adult Video Racket: उत्तर प्रदेशच्या नोएडामधल्या एका घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकल्यानंतर समोर आलेल्या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. किशोर आणि नीलू श्रीवास्तव नावाच्या जोडप्याने मॉडेल्सचे ॲडल्ट व्हिडिओ बनवून ते विकल्यानंतर कोट्यवधि रुपये कमावले. परदेशातून मोठ्या प्रमाणात रक्कम श्रीवास्तव दाम्पत्याकडे आल्याचे समजल्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली होती. मात्र घरात सुरु असलेला प्रकार समोर आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

किशोर आणि नीलू श्रीवास्तव हे घरात ॲडल्ट वेबकॅम स्ट्रीमिंग स्टुडिओ चालवत होते. दोघेही पैशाचे आमिष दाखवून मॉडेल्सकडून ॲडल्ट व्हिडिओ बनवून घ्यायचे आणि ते सायप्रसमधील टेक्निअस लिमिटेड या कंपनीला पाठवायचे. ही कंपनी आंतरराष्ट्रीय पोर्नोग्राफिक साइट्स चालवण्यासाठी ओळखली जाते. ही कंपनी पॉर्नोग्राफी साईटवर हे व्हिडीओ अपलोड करत होती. त्यातून श्रीवास्तव दाम्पत्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे येत होते. सबडिगी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली हा सगळा प्रकार सुरु होता. ईडीने फेमा अंतर्गत श्रीवास्तव दाम्पत्यावर छापा टाकला. त्यावेळी घरामध्ये वेबकॅम स्ट्रीमिंग सुरु होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन मॉडेल्सला ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

ॲडल्ट व्हिडिओचे हे रॅकेट पती-पत्नी मिळून गेल्या पाच वर्षांपासून चालवत होते. मुख्य आरोपी हा यापूर्वी रशियातील अशाच एका सिंडिकेटचा भाग होता. त्यानंतर तो भारतात आला आणि त्याने पत्नीसोबत हा घाणेरडा व्यवसाय सुरू केला. ही टोळी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काम करत होती. आरोपींनी फेसबुकवर एक पेज बनवले होते ज्याद्वारे मॉडेलिंगच्या ऑफर्स देऊन मुलींना भरघोस पगाराचे आमिष दाखवले जात होते.

दिल्ली-एनसीआरमधील अनेक मुली आणि मॉडेल्स ही जाहिरात पाहून त्या घरी पोहोचायच्या. तेव्हा आरोपीची पत्नी त्यांना पैशांचे आमिष दाखवून पॉर्न रॅकेटचा भाग बनण्यास सांगत असे. त्या मुलींना महिन्याला तुम्ही एक ते दोन लाख रुपये कमवू शकता असं आमिष दाखवले जायचे. पैशाच्या लालसेपोटी अनेक मुली या रॅकेटचा भाग बनल्या. ईडीने छापा टाकला तीन मॉडेल्स ॲडल्ट वेबकॅम स्ट्रीमिंगद्वार हे काम करताना आढळून आल्या.

ईडीच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन पोर्नोग्राफीदरम्यान या मॉडेल्सना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क असायचे. ग्राहकाने पाठवलेल्या रकमेनुसार मॉडेल्स कृती करायच्या. हाफ फेस शो, फुल फेस शो, न्यूड कॅटेगिरी अशा पद्धतीने मॉडेल्स काम करत होत्या. यासाठी ग्राहकांकडून वेगवेगळी रक्कम घेतली जायची. या कमाईतील ७५ टक्के रक्कम श्रीवास्तव दाम्पत्य घ्यायचं. तर उर्वरित रक्कम मॉडेल्सना दिली जायची. ग्राहकांचे पैसे आधी क्रिप्टोकरन्सीद्वारे ऑनलाइन पोर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या लोकांकडे जायचे त्यानंतर हे पैसे  श्रीवास्तव दाम्पत्याकडेयायचे. या रॅकेटमध्ये ५०० हून अधिक मुलींनी काम केल्याचा संशय ईडीला आहे. देशभरात अशा ऑनलाइन रॅकेटची संख्या लाखोंच्या घरात असू शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी