शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रय वैधतेस महिला कार्यकर्त्यांचीच ‘ना’

By admin | Updated: November 3, 2014 02:46 IST

देहविक्रय वैध ठरावा, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) हालचाली चालवल्या असताना, दुसरीकडे महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे़

नवी दिल्ली : देहविक्रय वैध ठरावा, यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) हालचाली चालवल्या असताना, दुसरीकडे महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र यास विरोध दर्शवला आहे़महिला आयोगाच्या अध्यक्ष ललिता कुमारमंगलम यांनी अलीकडे देशात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे जीवन सुधारण्यासाठी देहविक्रय वैध ठरविण्याचे समर्थन केले होते़ एवढेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाद्वारे गठीत समितीसमक्ष येत्या ८ नोव्हेंबरला यासंदर्भातील आपल्या शिफारशी सोपविण्याची तयारीही आयोगाने चालवली आहे़ महिला अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र यासंदर्भात पूर्णत: वेगळी भूमिका घेतली आहे़ ‘गैरगुन्हेगारीकरण’ आणि ‘वैधीकरण’ यातील पुसट सीमारेषेची नव्याने व्याख्या करण्याची गरज असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे़ महिला आपल्या मर्जीने देहविक्रय करतात की त्यांना ते काम करण्यासाठी बाध्य केले जाते, याकडे लक्ष देण्याची गरज या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे़अखिल भारतीय प्रगतिशील महिला संघाच्या सचिव कविता कृष्णन यांच्या मते, राष्ट्रीय आयोगाला देहविक्रय वैध करण्याबाबतच्या प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यापूर्वी देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था समूहांचा सल्ला घ्यायला हवा होता़ सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या संचालक रंजना कुमारी यांनी यापुढे जात आणखी एक वेगळे मत मांडले आहे़ देहविक्रयास वैधता प्रदान केल्यामुळे कामगार कायद्यांचे उल्लंघन होईल, असे मत त्यांनी मांडले आहे़ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, कुठलाही व्यापार जो ‘सभ्य’ असेल आणि बळजबरीने वा तो करण्यास बाध्य करण्यात आला नसेल तर तो व्यापार वैध आहे़ देहविक्रय यापैकी कुठल्याही श्रेणीत येत नाही़ आपण अद्यापही शेकडोक्षेत्रात कामगार कायदा लागू करू शकलेलो नाही आणि असे असताना देहविक्रय वैध करण्याच्या बाता मारतो आहोत, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)