शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

CoronaVirus News: उकाड्यात कोरोना संक्रमणाचा वेग मंदावतो?; 'या' शहरातल्या आकडेवारीतून मिळालं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:02 PM

CoronaVirus News: दिल्लीतील तापमान ४० अशांच्या पुढे; काल ४४ अंश तापमानाची नोंद

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख २० हजारांच्या आसपास पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. फेब्रुवारीपासून देशात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. त्यावेळी उकाडा वाढल्यावर कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग मंदावतो, असा दावा करण्यात येत होता. उकाडा वाढल्यावर कोरोना विषाणू फार काळ जिवंत राहणार नाही. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, असं म्हटलं जात होतं. मात्र दिल्लीत हा दावा फोल ठरताना दिसत आहे. राजधानी दिल्लीचं तापमान सध्या ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. मात्र सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे पाचशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज तर दिल्लीत कोरोनाचे ६०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. उष्णता वाढल्यानंतर कोरोनाचा विषाणू फार काळ जिवंत राहू शकत नाही, हा दावा दिल्लीत पूर्णपणे फोल ठरला आहे. गुरुवारी दिल्लीत ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद होऊनही गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६६० रुग्ण सापडले आहेत. एप्रिलपर्यंत दिल्लीतल्या कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग तुलनेनं कमी होता. मात्र मे महिना सुरू होताच कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढला. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दर दिवशी कोरोनाचे सरासरी ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर हाच आकडा ४०० च्या घरात पोहोचला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून दररोज कोरोनाचे ५०० हून जास्त रुग्ण सापडत आहेत. दिल्लीतल्या कोरोना बाधितांचा आकडा १२ हजारांहून जास्त आहे. वाळवंटी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीतलं तापमान वाढलं आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीतलं तापमान आणखी वाढणार आहे. सफदरजंग भागातलं तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. पालममध्ये ४४.१, आया नगरमध्ये ४३.२, नजफगढमध्ये ४२.२ आणि स्पोर्ट्स संकुल परिसरात ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या