शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

हिंदीवरून राजकीय घमासान; कमल हासन म्हणाले, कोणताही 'शाह' तोडू शकणार नाही 'ते' वचन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:09 PM

'शाह, सुल्तान  किंवा सम्राट ते वचन अचानक तोडू शकत नाहीत'

नवी दिल्ली : केद्रींय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला दिलेल्या समर्थनावरुन राजकीय घमासान सुरुच आहे. याविरोधात दाक्षिणेकडील नेत्यांनी आवाज उठवला आहे. यातच आता दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी ट्विट करुन अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. 

कमल हासन यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये देशात एक भाषा लादली जाऊ शकत नाही, असे झाल्यास मोठे आंदोलन होईल असे म्हटले आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत कमल हासन म्हणाले, "1950 मध्ये भारत प्रजासत्ताक झाला, त्यावेळी वचन दिले होते की प्रत्येक क्षेत्रातील भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि त्याला सुरक्षित ठेवले जाईल. त्यामुळे कोणताही शाह, सुल्तान  किंवा सम्राट हे वचन अचानक तोडू शकत नाही. "

अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या देशाच्या एकतेसाठी त्याग केला आहे. मात्र, लोक आपली भाषा, संस्कृती आणि ओळख विसरू शकत नाहीत. भारत एक असा देश आहे, त्याठिकाणी लोक एकत्र बसून जेवण करतात. कोणावर काही लादू शकत नाही, असे कमल हासन यांनी म्हटले आहे. याशिवाय नवीन कायदा लागू करण्याआधी सामान्य लोकांशी चर्चा केली पाहिजे. जलीकट्टूसाठी जे झाले ते फक्त प्रदर्शन होते. मात्र, भाषा वाचवण्यासाठी जे होईल, ते यापेक्षा मोठे होईल, असा इशाराही कमल हासन यांनी दिला आहे.

दरम्यान, हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी आज 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. अनेक भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी म्हटले होते.

अमित शाहांच्या या वक्तव्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनAmit Shahअमित शहाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMamata Banerjeeममता बॅनर्जीhindiहिंदी