शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

मोठ्या शहरांमध्ये मोदी लाट नाहीच; ८६ मतदारसंघांंमधील पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:58 AM

‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले.

- हरिश गुप्ता/नितीन आगरवाल 

नवी दिल्ली : मतदानाच्या सहाव्या टप्प्यापर्यंत (१२ मे) शहरी भागांत झालेले मतदान पाहता, यंदा निवडणुकीत मोदी लाट होती का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने २0१४ मध्ये शहरी भागांतील या ८६ पैकी ५५ जागांवर विजय मिळविला होता आणि तिथे भरघोस मतदान झाले होते. या सर्व ८६ मतदारसंघांमध्ये नेहमीपेक्षा २0 टक्के अधिक मतदान झाल्याचे आढळून आले होते.

‘लोकमत’च्या टीमने या ८६ मतदारसंघांतील २00९, २0१४ व २0१९ मध्ये झालेल्या मतदानाचा अभ्यास केला असता, यंदा वेगळे चित्र असल्याचे जाणवले. भरघोस मतदानाऐवजी यातील ४८ जागांवर खूपच कमी, तर ३८ ठिकाणी २0१४ इतकेच मतदान झाले. जिथे ५५ जागा जागा मिळविल्या होत्या, तिथेच त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

या ८६ पैकी ७ जागा राजधानी दिल्लीतील आहेत. त्यापैकी नवी दिल्ली मतदारसंघात मोदी व शहा यांनी सभा घेऊ नही ८.२६ टक्के कमी मतदान झाले. महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मोदी यांच्या गुजरातमधील अहमदाबाद (पश्चिम), बडोदा, राजकोट, कर्नाटकातील उत्तर व मध्य बंगळुरू, झारखंडमधील धनबाद (जेथून कीर्ती आझाद काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत.), तसेच उत्तर प्रदेशातील सहारणपूर, बरेली, गाझियाबाद, झाशी, कानपूर या सर्व ठिकाणी मतदानाचे प्रमाण कमी आहे. याच ठिकाणी २00९च्या तुलनेत २0१४मध्ये प्रचंड मतदान झाले होते.

मध्य प्रदेश व राजस्थानातील शहरांमध्येही अधिक मतदान झाल्याचे दिसते. भोपाळमध्ये २00९ पेक्षा २0१४ मध्ये १३ टक्के अधिक मतदान झाले होते. यंदा तिथे ८ टक्के अधिक मतदान झाले असून, त्याचा फटका दिग्विजय सिंह यांना बसू शकतो आणि प्रज्ञा सिंह यांना फायदा मिळू शकतो, असा अर्थ लावला जात आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीचा फटकानोटाबंदी व जीएसटीची वाईट पद्धतीने अंमलबजावणी यांचा फटका शहरी भागाला बसला आणि त्यामुळे मतदान कमी झाले, असे मानले जात आहे. कमी मतदानाचे विविध अर्थ लावले जात असले, तरी त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होतो, असा यंदा लावता येणार नाही. भाजपने जिंकलेल्या ५५ पैकी २७ मतदारसंघांत गेल्या वेळपेक्षा मतदानात किरकोळ वाढ झाल्याचे दिसते. आश्चर्य म्हणजे, त्यात मुंबईतील मतदारसंघही आहेत. अन्य महानगरांत मात्र हा उत्साह दिसलेला नाही. मुंबई व दिल्ली यांतील मतदानाच्या टक्क्यात हा फरक का, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी