मृत्यू पावलेल्या स्थलांतरित कामगारांची माहिती नाही - केंद्र सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:58 IST2020-09-15T00:52:49+5:302020-09-15T06:58:07+5:30
कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने वरील उत्तर दिले.

मृत्यू पावलेल्या स्थलांतरित कामगारांची माहिती नाही - केंद्र सरकार
नवी दिल्ली : कोरोनाची साथ आल्यानंतर देशभर ६८ दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला त्यांची माहिती उपलब्ध नाही, असे केंद्र सरकारने संसदेला सोमवारी सांगितले.
कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने वरील उत्तर दिले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आपापल्या मूळ गावी परत निघालेल्या कित्येक स्थलांतरीत कामगारांना आपला जीव गमवावा लागला याची माहिती सरकारकडून हवी होती. तसेच राज्यनिहाय तपशील व सरकारने मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक साह्य वा भरपाई दिली का याचीही माहिती मागण्यात आली होती.
मंत्रालयाने म्हटले की, अशी माहिती ठेवण्यात आलेली नाही आणि माहितीच उपलब्ध नसल्यामुळे भरपाईचा प्रश्नच उपस्थित होत नाही.