तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:59 IST2025-10-11T11:57:07+5:302025-10-11T11:59:00+5:30

तालिबानी परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकीच्या नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेने देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. शुक्रवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत ...

No Entry for Women Journalists in Taliban Foreign Minister amir khan muttaqi press conference Priyanka Gandhi Targets PM Modi; Government Responds | तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा

तालिबानी परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकीच्या नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेने देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. शुक्रवारी झालेल्या या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्याचा तालिबानी अधिकाऱ्यांचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. ही पत्रकार परिषद भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि मुत्ताकी यांच्या चर्चेनंतर झाली होती. 

दरम्यान, पत्रकारांना बोलावण्याचा निर्णय तालिबानी अधिकाऱ्यांनी घेतला होता. भारताने महिला पत्रकारांना समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. अफगान दूतावासात आयोजित या पत्रकार परिषदेशी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा काहीही संबंध नव्हता, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

तालिबानवर अफगानिस्तानात महिलांच्या हक्कांवर बंधने घालण्याचे आरोप होत आले आहेत. मुत्ताकीला महिलांच्या स्थितीसंदर्भात प्रश्न केला असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळले आणि प्रत्येक देशाचे रीति-रिवाज वेगळे असतात, असे सांगितले. मात्र, या घटनेनंतर देशातील राजकारण तापले आहे. यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, भारतात आलेल्या तालिबान प्रतिनिधीच्या प्रेस कॉन्फ्रन्समध्ये महिला पत्रकारांना का नाकारण्यात आले. जर महिलांच्या अधिकासंदर्भातील आपली भाषणे केवळ निवडणूक काळातील दिखावा नसतील, तर हा देशातील काही सक्षम महिलांचा हा अपमान आहे. हा अपमान आपल्या देशात कसा होऊ दिला. या देशाच्या महिला कणा आणि अभिमान आहेत.”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनीही सरकारवर हल्ला चढवला. “भारत सरकारने तालिबान प्रतिनिधीला भारतीय भूमीवर पूर्ण प्रोटोकॉलसह, महिला पत्रकारांना बाजूला ठेवून पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कशी दिली?” असा प्रश्न महुआ मोइत्रा यांनी केला आहे.ऑ


 

Web Title : तालिबान द्वारा महिला पत्रकारों का बहिष्कार, भारत में राजनीतिक विवाद

Web Summary : दिल्ली में मुत्ताकी की प्रेस कॉन्फ्रेंस में तालिबान द्वारा महिला पत्रकारों के बहिष्कार से राजनीतिक विवाद शुरू हो गया। भारत ने समावेशन की सलाह दी, लेकिन अफगान दूतावास ने आयोजन किया। प्रियंका गांधी और महुआ मोइत्रा ने मोदी सरकार की आलोचना की।

Web Title : Taliban's exclusion of female journalists sparks political row in India.

Web Summary : Taliban's exclusion of female journalists at Muttaqi's press conference in Delhi ignited political controversy. India advised inclusion, but the Afghan embassy organized it. Priyanka Gandhi and Mahua Moitra criticized Modi government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.