शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination : 12 ते 14 वर्षांच्या मुलांना लस कधीपासून मिळणार? जाणून घ्या, सरकारने काय सांगितले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 11:33 IST

Corona vaccination : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

नवी दिल्ली : भारतात करोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले आहे. परंतू 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लसीचे डोस देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सहव्याधीग्रस्त मुलांना प्राधान्याने लस द्या5 ते 14 वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या मुलांना कोरोनाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा मुलांना केंद्र सरकारने प्राधान्याने कोरोना लस द्यावी, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.

3.5 कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 15 ते 18 वर्षे वयोगटातील 3.5 कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात 3 जानेवारी रोजी, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लस सुरू करण्यात आली. ही मोहीम अतिशय वेगाने राबविली जात आहे. देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 7.4 कोटी मुले असून त्या सर्वांना या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य आहे. दरम्यान, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीनसाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंददेशात कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सोमवारी देशात 2 लाख 58 हजार 89 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामानाने आज 20 हजार 71 रुग्ण कमी झाले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या