शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूनं फक्त 126 मतं पडली आहेत. तर ठरावाच्या विरोधात 325 खासदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे.मतदानादरम्यान जवळपास 92 खासदार अनुपस्थित होते.  अविश्वास प्रस्तावावर एकूण 451 सदस्यांनी मतदान केलं आहे. प्रस्तावावरील मतदानानंतर लोकसभेची कार्यवाही सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे AIADMKच्या काही खासदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोदी सरकारला नवा मित्र सापडल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.मोदींनी यावेळी काँग्रेसला अहंकारी म्हटलं आहे. काँग्रेसची माणसं जी भाषा बोलतात, ती अतिआत्मविश्वास आणि अज्ञानातून आलेली आहे. हा अविश्वास प्रस्ताव नव्हे, तर काँग्रेसच्या कथित मित्र पक्षांची फ्लोअर टेस्ट आहे. मी पुन्हा पंतप्रधान बनेन याचं ट्रायल सुरू आहे. तसेच आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीवर मोदींनी भाष्य केलं आहे. जोरजबरदस्तीनं आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं. त्यावेळी मी म्हणालो होतो, तेलुगू आमची आई आहे. तेलुगूंच्या एकीची ताटातूट व्हायला नको होती. काँग्रेसमुळेच तेलंगणाचा वाद उत्पन्न झाला. काँग्रेसनं त्यावेळी भारत आणि पाकिस्तानचं विभाजन केलं आणि त्याचे परिणाम अजूनही आपण भोगतोय. काँग्रेसला विभाजन करून आंध्र प्रदेशला जिंकायचं होतं. परंतु काँग्रेसला ना आंध्र प्रदेश मिळालं ना तेलंगणा. आंध्र प्रदेशचं विभाजनं काँग्रेसनं बळाच्या जोरावर केलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यापासून लोकसभेचे कामकाज सलग 12 तास चालले. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवळपास दीड तास भाषण केले.शिवसेना व बिजू जनता दलाच्या खासदारांनी मतदानात भाग न घेता वॉकआऊट केलं. भाजपाचे खासदार के. सी. पटेल आणि भोला सिंग हे आजारी असतानाही फक्त मतदानासाठी लोकसभेत उपस्थित राहिले, तर खासदार पप्पू यादव यांनी मतदानादरम्यान सभात्याग केला. मोदींनी अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेल्या मित्रपक्षांचे आभारही मानले आहेत. तसेच 125 कोटी जनतेचा विश्वास आम्ही संपादन केला आहे. भारतात परिवर्तन घडवण्याबरोबरच तरुणांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही मोदी म्हणाले आहेत.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNo Confidence motionअविश्वास ठरावParliamentसंसदcongressकाँग्रेस