शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

No Confidence Motion : अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 09:04 IST

मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत चर्चा होणार आहे. या ठरावाच्या निमित्ताने विरोधी पक्ष सरकारवर जोरदार तुटून पडतील. सरकारचे अपयश देशापुढे मांडण्याचे काम आम्ही करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी सरकारवरील हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. 

दरम्यान, या अविश्वास ठरावावरील चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. ''संसदीय लोकशाहीसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. सखोल आणि अडथळ्याविना चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे'', असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. संपूर्ण देश आज आपल्याला जवळून पाहत आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले  आहे.

(No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात)

दरम्यान, सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीचे कौतुक भाजपा व मित्रपक्ष चर्चेमध्ये निश्चितच करतील. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही भाषण करतील आणि ते अतिशय आक्रमक व विरोधकांवर हल्ला चढविणारे असू शकेल. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने विरोधक व सरकार पक्ष यांना या ठरावाच्या निमित्ताने जोरदार आरोप-प्रत्यारोप होतील, हे उघड आहे.

या ठरावावरील चर्चेच्या वेळी आपल्या सदस्यांनी उपस्थित राहावे, यासाठी काँग्रेस, भाजपा, तेलगू देसम, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद यांसह जवळपास सर्वांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. शिवसेनेने मात्र ‘व्हिप’ सायंकाळी उशिरा मागे घेतला. आता ठाकरे शुक्रवारी भूमिका स्पष्ट करतील. शिवसेना कदाचित हजर राहून मतदान न करण्याचा किंवा मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णयही घेईल.  

कोण बाजूने, कोण विरोधात?ठरावाला शिवसेना व अण्णा द्रमुक हे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, तर तेलंगणा राष्ट्र समितीही या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका उद्या जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.

चर्चेला कोणाला किती वेळ?भाजपा : ३.३३ तासकाँग्रेस : ३८ मिनिटेअद्रमुक : २९ मिनिटेतृणमूल : २७ मिनिटेबीजेडी : १५ मिनिटेशिवसेना : १४ मिनिटेतेलगू देसम : १३ मिनिटेटीआरएस : ९ मिनिटेमाकप : ७ मिनिटेसपा : ६ मिनिटेराष्ट्रवादी : ६ मिनिटेलोजपा : ५ मिनिटे

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना