शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) पुरंदर शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

निकालही आजच जाहीर होणार : शिक्षक संघ आणि शिक्षक समितीला विजयाची आशा

निकालही आजच जाहीर होणार : शिक्षक संघ आणि शिक्षक समितीला विजयाची आशा
नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक उद्या (दि. १५ फेब्रुवारी) होत आहे. पुरंदर तालुका शिक्षक संघाचे सहकार पॅनल व शिक्षक समिती आणि पदवीधर संघटनेचे परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे. तर, तीन अपक्ष नशीब अजमावत आहेत. १५ जागांमधून १० जागा सवसार्धारण गटासाठी, २ जागा महिलांसाठी, तर ३ जागा इतर मागास, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्तांसाठी आरक्षित आहेत.
सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात होईल. दुपारी ४ वाजेपर्यंत ते चालणार आहे. तर, मतमोजणीला ५ वाजता सुरुवात होणार आहे. किमान ७ ते ८ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे. पतसंस्था ताब्यात ठेवण्यासाठी शिक्षक संघाची मोठी कसोटी लागणार आहे, कारण शिक्षक समितीनेही त्यांच्या समोर आता कडवे आव्हान ठेवले असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत पुरंदर ५८८, हवेली ५८, दौंड ४०, बारामती १८, भोर ४०, वेल्हा १४, मुळशी २, मावळ १, नगरपालिका २५ असे मिळून ७३६ मतदार आहेत. या ८ तालुक्यांत शिक्षक मतदार आहेत. सर्वच उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचला आहे. आपल्यालाच मतदान कसे होईल, यासाठी सर्वच उमेदवार फिल्डिंग लावून आहेत. सध्या शिक्षक संघाच्या ताब्यात पतसंस्था आहे. संघाचे विद्यमान १० संचालक पुन्हा निवडणूक लढवीत आहेत, तर शिक्षक समितीचे ६ संचालक पुन्हा निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत अनेक शिक्षकनेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिक्षक संघ सहकार पॅनलप्रमुख राजेंद्र जगताप, गोरख मेमाणे, तानाजी झगडे, संजय जगताप, प्रदीप कुंजीर, जितेंद्र कुंजीर, दत्तात्रय गायकवाड हे शिक्षकनेते प्रचार सांभाळत आहेत. तर, परिवर्तन आघाडीकडून अप्पा भिसे, अरुण महाडिक, तानाजी फडतरे, संदीप जगताप, सुनील लोणकर, राजेंद्र कुंजीर हे शिक्षक नेते प्रचार सांभाळत आहेत.
०००