शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज; भाजपाला एकही पद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 8:55 AM

बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्या भाजपा आणि जदयूमध्ये मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून फूट पडल्याचे दिसत आहे. जदयूला एकही मंत्रीपद न दिल्याने बिहारच्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रयोजन नितीशकुमार यांनी केले आहे. यामध्ये भाजपच्या एकाही मंत्र्याला शपथ देण्यात येणार नाही. 

बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जदयूच्या कोट्यातून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. बऱ्याच काळापासून हा विस्तार रखडला होता. मात्र, जदयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरण जदयूने दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिपद आणि मोदी सरकारमध्ये जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून विस्ताराबाबत कळविले आहे. राजभवनात सकाळी 11.30 वाजता हा शपथविधी होईल. यामध्ये अशोक चौधरी, नीरज कुमार, लक्ष्मेश्वर राय, श्याम रजक, बीमा भारती, संजय झा, नरेंद्र नारायण यादव यांचा समावेश आहे. या विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.

नितीशकुमारांवर लालूंच्या पक्षाची कुरघोडीविधानसभा निवडणुका दीड वर्षावर आल्याने सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीत जदयू आणि लालू प्रसाद यादवाच्या पक्षाने हात मिळवत भाजपाला सत्तेपासून दूर सारले होते. मात्र, त्यांच्यात बेबनाव झाल्याने नितीशकुमारांनी भाजपाशी संधान साधत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली होती. याचा बदला लालूंचा पक्ष राजदने भाजपाच्या नेत्यांनाच इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. राबडीदेवी यांच्या घरी ही पार्टी आयोजित केली असून भाजपासोबत असलेले अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरु असून काँगेस पुन्हा नितीशकुमारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपा