पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:32 IST2024-09-06T13:32:28+5:302024-09-06T13:32:52+5:30
Nitish Kumar News: मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते.

पुन्हा आरजेडीसोबत जाण्याबाबत नितीश कुमार यांचं मोठं विधान, म्हणले...
मागच्या दहा वर्षांमध्ये बिहारच्या राजकारणात घडलेल्या राजकीय उलथापालथींचे केंद्र हे नितीश कुमार बनले होते. या दहा वर्षांत नितीश कुमार यांनी त्यांच्या राजीक सोईनुसार भाजपा किंवा आरजेडी या पक्षांशी आघाडी करण्याचे निर्णय घेतले होते. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ आधी नितीश कुमार हे इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपासोबत आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून ते पुढच्या काळात काय भूमिका घेतील, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. तसेच नितीश कुमार हे पुन्हा एकदा आरजेडीसोबत महाआघाडीमध्ये प्रवेश करणार का? याबाबतही विचारणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचं एक विधान चर्चेत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या विधानामधून त्यांची आरजेडीसोबत जाण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा जनता दल युनायटेड पक्ष आरजेडीसोबत आघाडी करणार नाही. आम्ही दोन वेळा आरजेडीसोबत आघाडी केली होती. मात्र आता कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही.
दरम्यान, नितीश कुमार यांना २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध करत भाजपासोबतची आघाडी तोडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी भाजपासोबत पुन्हा एकदा मैत्री केली होती. मात्र दीड वर्षांनंतर त्यांचं पुन्हा एकदा भाजपासोबत बिनसलं आणि ते आरजेडीसोबत आघाडीत गेले. पण पुन्हा एकदा यावर्षाच्या सुरुवातीला दोघांचीही आघाडी तुटली होती. तसेच नितीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाचं बहुमत हुकल्याने नितीश कुमार यांची केंद्रातील भूमिका महत्त्वाची बनली आहे.