नितीशकुमार सात जन्मांत पंतप्रधान होणार नाहीत, माजी मंत्री आरसीपी सिंह यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:30 IST2022-08-19T13:30:18+5:302022-08-19T13:30:33+5:30
RCP Singh : आरसीपी सिंह यांनी म्हटले आहे की, सात जन्म घालविले तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधान बनू शकत नाहीत.

नितीशकुमार सात जन्मांत पंतप्रधान होणार नाहीत, माजी मंत्री आरसीपी सिंह यांचा टोला
पाटणा : माजी केंद्रीय मंत्री व जनता दल (यू)चे माजी अध्यक्ष रामचंद्र प्रसाद सिंह (आरसीपी सिंह) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ही घोषणा दस्तुरखुद्द त्यांनीच केली आहे. आरसीपी सिंह यांनी म्हटले आहे की, सात जन्म घालविले तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधान बनू शकत नाहीत.
आरसीपी सिंह यांनी सांगितले की, नितीशकुमार खाेटे बाेलत आहेत. त्याच्या संमतीनेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो होतो. या गोष्टीची पूर्ण कल्पना जनता दल (यू)चे विद्यमान अध्यक्ष ललनसिंह यांना आहे. जनता दल (यू)च्या प्रमुखांना न विचारताच आरसीपी सिंह हे केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले, असा आरोप त्या पक्षाने केला होता. भाजप व जनता दल (यू) यांची आघाडी तुटण्यासाठी आरसीपी सिंह हेच कारणीभूत होते असे सांगितले जाते. (वृत्तसंस्था)
भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी भाजपपमध्ये प्रवेशाचे संकेत देताना सांगितले की, कोणता नेता सध्या काय वक्तव्ये करतो आहे हे जनता खूप बारकाईने पाहत आहे. मी यापुढे काय हालचाली कराव्यात याचा निर्णय जनताच घेईल.