शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:02 IST

बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वात NDA चे सरकार स्थापन होत आहे.

Bihar Politics: बिहारमध्ये (Bihar) पु्न्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महाआघाडीशी फारकत घेत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर स्वतःला पीएम मोदींचे हनुमान म्हणवणारे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रत्येक निर्णयासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीएम मोदींसोबत कायमनितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान म्हणाले की, आगामी काळात सरकारची भूमिका काय आहे? सरकार कोणत्या अजेंड्यावर काम करेल? कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला आहे का? या सर्व प्रश्नांवर पुढे चर्चा केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा देणे आणि पुन्हा शपथ घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे.

मुख्यमंत्र्यांचा धोरणात्मक विरोध कायम राहीलते पुढे म्हणाले की,  बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मी एनडीएचा मित्रपक्ष म्हणून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट हे आमचे पंतप्रधान मोदीजींचे विचार आणि दृष्टी आहे. मुख्यमंत्र्यांना माझा धोरणात्मक विरोध होता आणि अजूनही आहे. त्यांच्या धोरणांमुळे बिहारच्या जनतेचा विकास झाला नाही, हे मी आधी बोललो होतो. मुख्यमंत्र्यांनी त्याच धोरणांवर काम केले, तर भविष्यातही हा विरोध कायम राहील.

नितीश कुमारांचा शपथविधीनितीश कुमार 28 जानेवारी 2024 रोजी 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे, त्यांच्या पक्षाने 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका NDA सोबत लढून 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 74 जागा जिंकल्या होत्या. यानंतर 2022 मध्ये त्यांनी भाजपशी संबंध तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आणि आता पुन्हा एकदा एनडीएशी हातमिळवणी केली आहे.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी