नितीश कुमार म्हणतात अंधारात ज्यूस पिऊन मिळवा दारुची मजा

By Admin | Updated: September 13, 2016 19:22 IST2016-09-13T19:22:04+5:302016-09-13T19:22:04+5:30

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली आहे. दारूबंदीचा 'त्रास' होणा-या लोकांसाठी नितीश कुमार यांनी खास सल्ला दिला आहे.

Nitish Kumar says that drinking yellow juice in the dark drinks liquor | नितीश कुमार म्हणतात अंधारात ज्यूस पिऊन मिळवा दारुची मजा

नितीश कुमार म्हणतात अंधारात ज्यूस पिऊन मिळवा दारुची मजा

ऑनलाइन लोकमत

पटना, दि.13- बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली आहे. दारूबंदीचा 'त्रास' होणा-या लोकांसाठी नितीश कुमार यांनी खास सल्ला दिला आहे. अंधारात ज्यूस पिला तर दारू पिल्याचीच मजा येईल असं नितीश म्हणाले. 

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार नितीश म्हणाले, दारूबंदीमुळे इतका मोठा सकारात्मक बदल झालेला असताना एक,दोन पेगसाठी कशाला वाट लावायची? लाइट बंद करा आणि ज्यूस प्या, तुम्हाला 'तसंच' वाटेल. 

 
दारूबंदीमुळे जेवढा आनंद झाला तेवढा आनंद मला पुर्वी कधीही नव्हता झाला असं नितीश म्हणाले. बिहार सरकारने यावर्षी एप्रिल महिन्यापासून राज्यात दारूबंदी लागू केली आहे. शिवाय नितीश कुमारांनी पंतप्रधानांकडे संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्याची मागणीही केली आहे. 

Web Title: Nitish Kumar says that drinking yellow juice in the dark drinks liquor