नितीशकुमार हे आघाडीचे नेतेच - लालुप्रसाद यादव

By Admin | Updated: September 14, 2016 05:31 IST2016-09-14T05:31:52+5:302016-09-14T05:31:52+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (युनायटेड) यांच्या आघाडीचे नेते आहेत. प्रसारमाध्यमेच हा वाद निर्माण करू पाहत आहेत

Nitish Kumar is the leading leader - Lalu Prasad Yadav | नितीशकुमार हे आघाडीचे नेतेच - लालुप्रसाद यादव

नितीशकुमार हे आघाडीचे नेतेच - लालुप्रसाद यादव

अनिल सिन्हा,  पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (युनायटेड) यांच्या आघाडीचे नेते आहेत. प्रसारमाध्यमेच हा वाद निर्माण करू पाहत आहेत, असे राजदचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांनी मंगळवारी काढले.
राजदचा तुरुंगातून सुटून आलेला माजी खासदार शहाबुदिनदन आणि अन्य एक नेते रघुवंश प्रसाद यांनी नितीशकुमार यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लालुप्रसादांनी वाद शमवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसते.
ते म्हणाले की शहाबुद्दिन
यांनी नितीशकुमारांविरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही वा त्यांच्याविषयी वाईट उद्गारही काढलेले नाहीत. शहाबुद्दिनने लालुप्रसादच आपले नेते आहेत, असे म्हणण्यात काही चूक नाही, कारण ते आमच्या पक्षामध्ये आहेत, असे लालुप्रसाद म्हणाले.

Web Title: Nitish Kumar is the leading leader - Lalu Prasad Yadav