शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खेळ आकडेवारीचा! बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी सुरूच; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 16:44 IST

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी अद्याप सुरूच असल्याचे दिसते.

आगामी काळात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी अद्याप सुरूच असल्याचे दिसते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतचे सरकार पाडून पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. मात्र, हा राजकीय खेळ अजून संपलेला नाही. सत्तापालट आणि सत्तेतून बेदखल झाल्यानंतरच तेजस्वी यादव यांनी सांगितले होते की, हा खेळ अजूनही सुरू आहे. १२ फेब्रुवारीला बिहार सरकारचे भवितव्य ठरणार आहे. 

१२ फेब्रुवारीला बिहार विधानसभेत नितीश कुमार यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे. बिहारमध्ये बहुमताचा आकडा १२२ आहे आणि नितीश कुमार यांना १२८ आमदारांचा पाठिंबा आहे, जो बहुमताच्या आकड्यापेक्षा ६ ने अधिक आहे. काँग्रेसने आपल्या १६ आमदारांना हैदराबादमध्ये ठेवले आहे. 

१२ तारखेला नितीश सरकारची बहुमत चाचणी नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा दावा बिहारमधील काँग्रेसचे आमदार करत आहेत. एकीकडे काँग्रेसला आपले आमदार फुटण्याची भीती आहे, तर दुसरीकडे काँग्रेसच खेळ करण्याची भाषा करत आहे. आरजेडी-काँग्रेस आघाडीचा जदयूच्या १२ आमदारांवर डोळा आहे. काहींना मंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे तर काहींना लोकसभेचे तिकीट देण्याचे आमिष दाखवले जात आहे. 

बिहार विधानसभेचे अध्यक्षपद भूषवणारे आरजेडीचे आमदार अवध बिहारी चौधरी यांनी आज स्पष्ट केले की, १२ तारखेपूर्वी आपण राजीनामा देणार नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांनी बिहारी चौधरी यांच्याविरोधातच अविश्वास ठराव मांडला आहे. अवध बिहारी चौधरी यांच्या माध्यमातून आरजेडीला खेळ करायचा असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत.

कोणाकडे किती आमदार? नितीश कुमार यांना १२८ (भाजपा+जदयू) आमदारांचा पाठिंबा आहे, तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्याकडेही ११४ आमदार आहेत. म्हणजेच तेजस्वी यादव हे देखील बहुमतापासून केवळ आठ आमदार दूर आहेत. २०२२ मध्ये जेव्हा नितीश कुमार भाजपापासून वेगळे झाले आणि आरजेडीशी युती करून सरकार स्थापन केले. त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची भाजपाचे विजय कुमार सिंह यांच्याकडे होती, ज्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वी राजीनामा दिला होता. मात्र यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे अवध बिहारी चौधरी राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. एकूणच १२ तारखेलाच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेसTejashwi Yadavतेजस्वी यादव