Nitish Kumar : "INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:14 PM2023-11-02T12:14:48+5:302023-11-02T12:21:37+5:30

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Nitish Kumar attack on congress says no work is being done in india alliance | Nitish Kumar : "INDIA आघाडीत कोणतंच काम होत नाही, काँग्रेस 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त"

फोटो - आजतक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन झाली. मात्र सध्या आघाडीचं कोणतंही काम होत नाही. काँग्रेस पक्ष याकडे लक्ष देत नाही. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

नितीश कुमार यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. "आज केंद्रातील सरकारला देशाशी काही देणंघेणं नाही. ते (भाजपा) देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. एकीकडे नितीश कुमार यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले, तर दुसरीकडे सर्वांना सोबत घेऊन जाणारे असं स्वतःचं वर्णन केलं आहे. 

"आम्ही सर्वांना एकत्र करतो. सर्वांना सोबत घेऊन चालतो. आम्ही सोशलिस्ट आहोत. सीपीआयशी आमचं नातंही जुनं आहे. कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट यांना एकत्रितपणे पुढे जायचं आहे" असं नितीश कुमार यांनी म्हटलं. भाजपाशी संबंध तोडल्यानंतर नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. विविध राज्यात जाऊन त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणण्यातही नितीश यशस्वी ठरले. यानंतर नितीश यांनी जूनमध्ये पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, डीएमके यांच्यासह 15 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Nitish Kumar attack on congress says no work is being done in india alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.