शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
2
सौदी आता अमेरिकेपासून चार हात लांब; मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन, राजकीय पट बदलणार!
3
बारामती बिनविरोध नाही? काँग्रेस उमेदवार देणार, पक्षश्रेष्ठींचा होकार; लवकरच जाहीर करणार!
4
कोण आहेत १६७ कोटींची पेटिंग खरेदी करणारे सायरस पूनावाला? 'वॅक्सिन किंग'च्या नावानं आहेत प्रसिद्ध, नेटवर्थ किती?
5
पाकिस्तानात तेलाचा भडका! पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांवर, जनतेला वाऱ्यावर सोडून US ला करतोय पुरवठा? होतेय भारताशी तुलना
6
नमिता थापर यांच्या 'एमक्योर'चा मास्टरस्ट्रोक! वजन कमी करण्याचे इंजेक्शन ५५% स्वस्त, नवीन किंमत आवाक्यात
7
नराधमपणाचा कळस! मुलाचा आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी; आईनेच आवळला गळा
8
Gold Silver Rate Today: कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले; लग्नसराईच्या काळात खरेदीची उत्तम संधी?
9
पाकिस्तानवर अफगाणिस्तानचे 'सर्जिकल स्ट्राइक', रणगाडे घुसवून सैनिकी तळ उद्ध्वस्त ! तीन पाक सैनिक ठार, अनेक गंभीर
10
लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!
11
मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप 
12
हा काय घाणेरडा प्रकार? संजय दत्तच्या रेस्टॉरंटमध्ये जिवंत माश्याचं कॉकटेल, सोशल मीडियावर संताप
13
OTP चं टेन्शन संपणार, आता SIM बदलताच ब्लॉक होणार बँक अकाऊंट; पाहा काय आहे नवं सायलेंट ऑथेंटिकेशन
14
"आम्हाला वाटलं फटाके फुटतायत, पण..."; चिमुरडीच्या डोक्यात घुसली गोळी! गँगवॉरने घेतला निरागस जीव
15
इराणचा सर्वात मोठा पूल उद्ध्वस्त! ट्रम्प यांचा 'व्हिडिओ' बॉम्ब; "तडजोड करा, अन्यथा होत्याचं नव्हतं करू"
16
जग युद्धातून सावरत नाही अन् ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब; औषधांवर १०० टक्के कर; नियम बदलले
17
आजचे राशीभविष्य, ०३ एप्रिल २०२६: परदेशवारीची संधी, यश-प्रगती; पण अचानक खर्च वाढतील
18
राजधानी दिल्लीत रंगले राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य; पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र
19
भारतीय कामगारांसाठी आखाती देश ठरताहेत 'डेथ ट्रॅप'; दर २४ तासांत २० जणांचा परदेशात मृत्यू : सरकारची आकडेवारी
20
इराण मोहीम फत्ते करू; ट्रम्प यांचे अमेरिकावासीयांना उद्देशून भाषण, तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात नवे पर्व! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; दिल्लीत अधिकृतपणे घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:18 IST

२०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. 

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचं प्रमाणपत्र सोपवले.

यावेळी मावळते अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटलं की, आज ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तरुण, प्रतिभावान नितीन नबीन आज पदभार स्वीकारत आहेत. मी कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

अशी झाली निवडणूक प्रक्रिया

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटनिंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांच्याकडे नितीन नबीन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एकूण नामांकनाचे ३७ संच सादर करण्यात आले ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ ते ४ या वेळेत पूर्ण झाली. नामांकन अर्जाच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यातून आले. उरलेला एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला. 

आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. भाजपाच्या राजकीय इतिहासात अटल बिहारी वाजपेयींपासून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या नेत्यांनी पक्ष सांभाळला. परंतु सर्वात कमी वयाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांचे नाव पुढे आले. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यानंतर १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

१९९१ ते ११९३ या काळात वयाच्या ५७ व्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे, २०००-२००१  बंगारू लक्ष्मण, २००१-२००२ जना कृष्णमूर्ती, २००२-२००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३-२०१४ या काळात राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ मध्ये नितीन गडकरी, २०१४ ते २०२० वयाच्या ४९ व्या वर्षी अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nitin Nabin Elected as BJP National President: New Era Begins

Web Summary : Nitin Nabin is BJP's new national president, succeeding J.P. Nadda. Top leaders including Modi congratulated him. Nabin, a former Bihar minister, brings extensive experience. He is the youngest president in the party's history, signaling a fresh direction for the BJP.
टॅग्स :BJPभाजपाNitin Nabinनितीन नबीनNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाह