शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

Nitin Gadkari: "कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती’’, नितीन गडकरींचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 7:39 PM

Nitin Gadkari News: केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता.

जयपूर - केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता. तिथे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये गडकरींनी जोरदार राजकीय  टोलेबाजीही केली. (Nitin Gadkari)‘’कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती वाटत आहे’’, असा टोला गडकरी यांनी लगावला. ("Someone is sad not to become a minister, but someone is afraid of losing his seat", Nitin Gadkari)

नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीवर कुणाचेही नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले समस्या सगळ्यांसोबत आहे. पक्षात आहे आणि पक्षा बाहेरही आहे. ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकजण दु:खी आहे. कुणी मंत्री न बनल्याने दु:खी आहे. तर मुख्यमंत्री कधी खुर्ची जाईल, या भीतीने दु:खी आहेत.

राजस्थान विधानसभेमध्ये संसदीय लोकशाहीवरील सेमिनारला संबोधित करताना गडकरी यांनी अनेकदा राजकीय चिमटे काढले. मात्र त्यांनी यादरम्यान, कुणाचेही नाव घेतले नाही. यावेळी गहलोत सरकारलाही त्यांनी चिमटा काढला. ते म्हणाले आमदारांना मंत्री न बनल्याचं दु:ख आहे. तर मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी आहे. ज्याच्याकडे चांगलं खातं आहे ते मुख्यमंत्री न बनल्याने दु:खी आहेत. तर मुख्यमंत्री हे पदावरून हटवण्यात आल्याच्या भीतीने दु:खी आहेत. गडकरी यांनी राजकारणात येणाऱ्या उतार-चढावांबाबत सांगितले की, एकदा नागपूरमध्ये त्यांच्या एका काँग्रेसमधील मित्राने त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र मी विचारसरणीशी तडजोड केली नाही. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारण