शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 8:57 AM

इंधनाचे दर कमी करण्यासाठी गडकरींनी सुचवला उपाय

रायपूर: केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणाले. ते छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बोलत होते. डिझेल, पेट्रोल दरवाढीवरुन भाजपा ट्रोल; आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसनं दाखवला आरसाआपण तब्बल आठ लाख कोटी रुपयांचं पेट्रोल, डिझेल आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळेल, असं गडकरी यांनी म्हटलं. 'मी गेल्या 15 वर्षांपासून देशातील शेतकरी, आदिवासींना इथेनॉल, मेथानॉल आणि जैव इंधनाच्या उत्पादनाचं महत्त्व सांगत आहे', याचीही आठवण त्यांनी करुन दिली. इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलंछत्तीसगडमध्ये जैव इंधनाचं केंद्र होण्याची क्षमता असल्याचं गडकरी म्हणाले. 'नागपुरात जवळपास एक हजार ट्रॅक्टर जैव इंधनावर चालतात. या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वाहन चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा प्रयोगांना आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. छत्तीसगड कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात समृद्ध आहे. राज्यात गहू, तांदूळ, ऊस आणि डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे छत्तीसगड जैव इंधन निर्मितीत मोठी कामगिरी करु शकतं,' असं गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलNitin Gadkariनितीन गडकरी