'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:25 IST2025-10-30T17:25:42+5:302025-10-30T17:25:57+5:30

Nitin Gadkari: प्रत्येक महामार्गावर QR कोड, नागरिकांना थेट कॉन्ट्रॅक्टरची माहिती मिळणार!

Nitin Gadkari: 'If the road gets damaged, people abuse me, from now on...', Nitin Gadkari's big decision, know | 'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या

'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या

Nitin Gadkari on Road Safety: खराब रस्त्यांसाठी आपण सरकारला दोष देतो. पण आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. "रस्ता खराब असेल, तर जबाबदारी ठरलीच पाहिजे", असे गडकरी म्हणाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते बांधकाम कंपन्यांना त्यांचे स्वतःचे YouTube चॅनेल तयार करण्याचे आणि प्रत्येक प्रकल्पाचे व्हिडिओ शेअर करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रत्येक रस्त्यावर QR कोड असलेले बोर्ड

गडकरींनी जाहीर केले की, आता प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर QR कोड असलेले बोर्ड लावले जाणार आहेत. कोणताही नागरिक तो कोड स्कॅन करून जाणून घेऊ शकेल की, तो रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने बांधला आहे, कोणत्या सल्लागाराने डिझाईन केला आहे आणि कोणता सरकारी अधिकारी त्याच्या देखरेखीसाठी जबाबदार आहे.

रस्ता खराब झाला तर, लोक सोशल मीडियावर मला शिव्या देतात, पण चूक ज्याची आहे, त्यालाच जबाबदार धरले पाहिजे. आता QR कोडमुळे जनतेला थेट माहिती मिळेल आणि योग्य व्यक्तीला प्रश्न विचारता येतील, असेही नितीन गडकरींनी सांगितले.

टोल घेताय, तर तर रस्ता आंतरराष्ट्रीय दर्जाचा हवा

गडकरी पुढे म्हणाले की, जेव्हा नागरिक टोलटॅक्स देतात, तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग मिळालाच पाहिजे. खराब हवामान किंवा निकृष्ट डांबराचा बहाणा चालणार नाही. जर रस्ता आरामदायी नसेल, तर तात्काळ दुरुस्ती करा. खर्च वाढला तरी चालेल, पण गुणवत्तेत तडजोड नाही.

पारदर्शकतेवर भर

गडकरींनी असेही सांगितले की, आता प्रत्येक रस्ता प्रकल्पात उत्तरदायित्व आणि पारदर्शकता अनिवार्य असेल. त्यासाठी परफॉर्मन्स ऑडिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणत्या प्रकल्पात डिझाईन किंवा देखभालात कमतरता आहे, हे समजेल आणि चांगले काम करणाऱ्यांचा गौरव केला जाईल.

प्रत्येक प्रकल्पाचे व्हिडिओ YouTube वर अपलोड करावे लागणार

रस्ते परिवहन सचिव वी. उमाशंकर यांनी सांगितले की, NHAI आणि बिल्डर्सना आता त्यांच्या प्रत्येक प्रकल्पाचे व्हिडिओ अपडेट्स ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक राहील. अनेक वेळा आम्हाला प्रकल्पांची खरी माहिती स्वतंत्र यूट्यूबर्सकडून मिळते. त्यामुळे आता व्हिडिओ अपलोडिंगला करारातील अट करण्यात येत आहे.

Web Title : गडकरी का बड़ा फैसला: खराब सड़कों के लिए जवाबदेही, YouTube अपडेट अनिवार्य

Web Summary : नितिन गडकरी ने खराब सड़कों के लिए जवाबदेही अनिवार्य की। क्यूआर कोड ठेकेदार, डिजाइनर और जिम्मेदार अधिकारियों का खुलासा करेंगे। पारदर्शिता और गुणवत्ता आश्वासन के लिए एनएचएआई और बिल्डरों को यूट्यूब पर प्रोजेक्ट वीडियो अपलोड करने होंगे। अंतर्राष्ट्रीय मानक अनिवार्य हैं।

Web Title : Gadkari's Big Decision: Accountability for Poor Roads, YouTube Updates Mandatory

Web Summary : Nitin Gadkari mandates accountability for bad roads. QR codes will reveal contractor, designer, and responsible officials. NHAI and builders must upload project videos on YouTube for transparency and quality assurance. International standards are a must.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.