शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

चीनला नितीन गडकरींचा जोरदार धक्का; कंपन्यांना हायवे प्रकल्पांमध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 4:36 PM

India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अ‍ॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत.

नवी दिल्ली : चीनविरोधात भारताने मोर्चेबांधणी वेगवान केलेली असताना आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. सरकारने अ‍ॅप बॅन केलेले असताना आता गडकरींनी हायवे प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची एन्ट्री बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. 

नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे हायवे प्रकल्प लाटायचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखले जाणार आहे. याशिवाय सरकारही MSME सेक्टरमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होऊ न देण्यासाठी पडताळणी करणार आहे. केंद्र सरकार लवकरच चीनविरोधी पॉलिसी आणणार असून त्या द्वारे चिनी कंपन्यांची भारतीय प्रकल्पांमध्ये एन्ट्री बंद होईल. भारतीय कंपन्यांसाठी नियम सोपे केले जाणारा आहेत. कोणत्याही प्रकल्पात भारतीय कंपन्यांना अधिकाधिक संधी कशी मिळेल याचाही या पॉलिसीमध्ये विचार केला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. 

...तर निविदा रद्द होईलहायवे प्रकल्पांमध्ये सध्याच्या घडीला काही असे प्रकल्प आहेत, ज्यामध्य़े चीनची गुंतवणूक आहे. मात्र, चालू स्थितीमध्ये जर कोणत्या टेंडरमध्ये जर कोणत्याही चायनिज व्हेंचरसोबत मिळून भारतीय कंपनीने निविदा भरलेली असल्यास किंवा त्यांना ते मिळाल्यास प्रक्रियाच रद्द करून पुन्हा नव्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा गडकरी यांनी दिला. हा नियम सध्या आलेल्या किंवा भविष्यातील निविदा प्रक्रियांसाठी लागू असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

चीनविरोधात कारवाईगलवान घाटीमध्ये हिंसक घटना घडल्यानंतर भारतात #BoycottChina मोहिम सुरु झाली. यानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेत चिनी कंपनीला दिलेले 471 कोटींचे कंत्राट रद्द केले होते. 16 जूनला गलवानमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. रेल्वेने हा निर्णय 18 जूनला घेतला होता. तर बीएसएनएल आणि  एमटीएनएलने चीनच्या कंपन्यांना दिलेले 4जी चे कंत्राट आजच रद्द केले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अ‍ॅप आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीchinaचीनIndian Armyभारतीय जवानhighwayमहामार्ग