उत्तर प्रदेश : नातेवाईकाच्या घरी जेवण केल्यानंतर 9 जणांचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 08:53 IST2018-01-11T08:53:08+5:302018-01-11T08:53:13+5:30

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका नातेवाईकाच्या घरी जेवण जेवल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

nine people died after consuming food at their relative place in at barabanki uttar pradesh | उत्तर प्रदेश : नातेवाईकाच्या घरी जेवण केल्यानंतर 9 जणांचा झाला मृत्यू 

उत्तर प्रदेश : नातेवाईकाच्या घरी जेवण केल्यानंतर 9 जणांचा झाला मृत्यू 

लखनौ - उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका नातेवाईकाच्या घरी जेवण जेवल्यानंतर 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व जण एका नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमानिमित्त एकत्र जमले होते.  9 जणांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. बाराबंकीमधील ताल खुर्द गावातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मृत पावलेले सर्वजण आपल्या नातेवाईकाच्या निवासस्थानी कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती. यादरम्यान, सर्वांनी एकत्र भोजन केले होते. जेवणानंतर सर्वांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला व या 9 जणांना तातडीनं लखनौमधील ट्रॉमा सेंटर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 9 जणांचा मृत्यू झाला. 

बाराबंकीचे एडीएम अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असून अन्य मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. 
 

 

 



 



 



 

Web Title: nine people died after consuming food at their relative place in at barabanki uttar pradesh