दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:06 IST2025-05-26T16:05:42+5:302025-05-26T16:06:20+5:30

CRPF जवान 2023 पासून पाकिस्तानला माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

NIA arrests CRPF jawan in Delhi; accused of spying for Pakistan | दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

दिल्लीत NIA ने CRPF जवानाला घेतले ताब्यात; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरातून अनेक हेर पकडले जात आहेत. अलिकडेच ज्योती मल्होत्रा ​​नावाच्या एका युट्यूबरलाही हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आता राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दिल्लीतून एका CRPF जवानाला अटक केली आहे. तो देशाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या जवानाला माहिती पाठवण्यासाठी पैसे मिळायचे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली एनआयएने दिल्लीतून सीआरपीएफ जवान मोती राम जाटला अटक केली आहे. तो 2023 पासून भारताची गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवायचा. एनआयएच्या पथकाने त्याला पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष न्यायालयात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला 6 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली जात आहे. 

पैशासाठी देशद्रोह
एनआयएला तपासात असे आढळून आले की, आरोपी गेल्या 2 वर्षांपासून हेरगिरी करत होता. त्याला यासाठी पाकिस्तानकडून भरपूर पैसे मिळायचे. हे व्यवहार बहुतेक हवालाद्वारे केले जात होते. या संपूर्ण प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो, असे पथकाने म्हटले आहे. त्यामुळे चौकशीनंतर आणखी अनेक गुपिते उघड होतील. मोतीराम जाटच्या संपर्कात असलेल्या किंवा ज्यांच्याद्वारे ही माहिती लीक होत होती अशा व्यक्तींवरही एजन्सी लक्ष ठेवून आहे. 

सीआरपीएफने जवानाला नोकरीवरून काढूले
अटकेनंतर सीआरपीएफच्या नियमांनुसार जवानाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय नाव ज्योती मल्होत्रा ​​आहे. युट्यूबर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली.

Web Title: NIA arrests CRPF jawan in Delhi; accused of spying for Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.