सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:24 PM2023-10-13T13:24:02+5:302023-10-13T13:32:27+5:30

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती.

Newly-installed weather station stopped sending signal days before Sikkim floods | सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

सिक्कीममध्ये महापूर येण्याच्या १५ दिवसांपूर्वी आपतकालीन यंत्रणा पडली होती बंद; डेटाही मिळाला नाही

नवी दिल्ली: सिक्कीममधील ढगफुटी होऊन ३७ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये १० जवानांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत ७८ जण बेपत्ता आहेत. या पुरामुळे एकूण ३७०९ लोक बेघर झाले आहेत. दरम्यान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अशा अचानक येणाऱ्या आपत्तीसाठी दोन केंद्र उभारली होती. मात्र आपत्तीच्या काही दिवसांपूर्वी एका स्टेशनचे काम बंद पडले होते, अशी माहिती समोर आली आहे.

शास्त्रज्ञांनी सिक्कीममधील बर्फाच्छादित सरोवरात दोन हवामान केंद्रे उभारली होती. ही १६ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने स्थापित केली होती. जेणेकरून पाऊस आणि ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड (GLOF)शोधता येईल. एक दक्षिण ल्होनाक ग्लेशियल लेकजवळ स्टेशन उभारण्यात आले. तर दुसरे शाकोचो ग्लेशियल लेकजवळ केंद्र उभारण्यात आले आहे. दोन्ही केंद्राकडून सतत डेटा मिळत होता. मात्र ३-४ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या सिक्कीमध्ये ढगफुटी होण्याच्या काही दिवसांआधी, दक्षिण ल्होनक ग्लेशियलजवळील हवामान केंद्राने डेटा पाठवणे बंद केले होते. म्हणजे त्याच्याकडून एकही फोटो उपलब्ध झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 

शाकोचो येथील हवामान केंद्र दररोज २५० फोटो आणि डेटा पाठवत होते. परंतु दक्षिण लोनाक ग्लेशियल लेकजवळील हवामान केंद्राने १९ सप्टेंबरपासून डेटा पाठवणे बंद केले होते. यानंतर, ITBP टीमने २८ सप्टेंबरला तिथे जाऊन स्टेशनची पाहणी केली. स्टेशन सुरक्षित आणि सुरक्षित होते. मात्र त्यातून डेटा उपलब्ध झाला नाही. शाकोचो हवामान केंद्र अद्याप कार्यरत आहे. अशा आपत्ती टाळण्यासाठी GLOF रिस्क मिटिगेशन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. अशी हवामान केंद्रे अनेक ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. संपूर्ण हिमालयात १२ हजारांहून अधिक लहान-मोठे हिमनद्या आहेत. जे हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे सतत वितळत आहेत. या ढासळल्यामुळे हिमनदी तलाव तयार होण्याचा धोका आहे. १९८५ मध्ये नेपाळमधील डिग त्शो सरोवर तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली होती. १९९४ मध्ये भूतानमधील लुग्गे त्सो सरोवर फुटल्यामुळे अशीच दुर्घटना घडली होती. २०१३मध्ये केदारनाथ दुर्घटनेत ६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. येथेही चोरबारी हिमनदी तुटली होती. 

ल्होनाक तलाव फुटल्यानंतर काय झाले?

३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ल्होनाक तलावाच्या भिंतींना तडे गेले. साचलेले पाणी झपाट्याने खालून वाहणाऱ्या तीस्ता नदीत शिरले. त्यामुळे मंगल, गंगटोक, पाकयोंग आणि नामची जिल्ह्यात भीषण विध्वंस झाला. चुंगथांग NHPC धरण आणि पूल वाहून गेले. मिन्शिथांग येथील दोन, जेमा येथील एक आणि रिचू येथील एक पूल वाहून गेला. सिक्कीमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, पाण्याचा प्रवाह १५ मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे ५४ किलोमीटर प्रति सेकंद. १७ हजार फूट उंचीवरून या वेगाने पाणी खाली आले तर ते भयंकर विनाश घडवण्यासाठी पुरेसे आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते उद्ध्वस्त झाले. 

Web Title: Newly-installed weather station stopped sending signal days before Sikkim floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.