शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंड -लंका सामना

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमाल

९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमाल
न्यूझीलंडकडून लंकेची शिकार

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्वबाद २३३ धावांत आटोपला.
लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरु तिरिमाने याने सर्वाधिक ६५ तसेच कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कोरी ॲण्डरसन, डॅनिअल व्हेट्टोरी, टिम साऊदी, ॲडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेट्टोरीने दहा षटकांत केवळ ३४ धावा दिल्या.
त्याआधी यजमान संघाकडून ॲण्डरसनने ७५, कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम ६५, केन विलियम्सन ५७ आणि मार्टिन गुप्तिल ४६ यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६ बाद ३३१ धावा उभारल्या. पाठलाग करणाऱ्या लंकेकडून तिरिमाने- दिलशान यांनी सलामीला १३ षटकांत ६७ धावा ठोकल्या. अनुभवी व्हेट्टोरीने दिलशानचा आपल्याच चेंडूवर झेल घेत पहिला धक्का दिला. कुमार संगकाराने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने विश्वचषकात हजार धावा पूर्ण केल्या तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. व्हेट्टोरीने अनुभवी माहेला जयवर्धनेला भोपळा न फोडू देता रोंचीकडे झेल देण्यास बाध्य केले. संगकारा पायचित झाल्याने लंकेची स्थिती ४ बाद १२९ झाली होती. मिल्नेने करुणारत्ने १४ आणि मेंडिस ४ यांना एकाच षटकात टिपले. ३३ व्या षटकांत कुलसेकरा बाद झाला. लंकेला दहा षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती पण ४२ व्या षटकांत साऊदीने कर्णधार मॅथ्यूजला बाद करताच विजयाच्या आशा मावळल्या.
त्याआधी नाणेफेक गमविल्यानंतर फलंदाजी मिळालेल्या न्यूझीलंडकडून मॅक्यूलम- गुप्तिल यांनी १५.५ षटकांत १११ धावांची सलामी दिली. या जोडीने लसिथ मलिंगाच्या चार षटकांत ४२ धावा वसूल करताच त्याला हटविण्यात आले. त्याने दहा षटकांत एकूण ८४ धावा मोजल्या. मॅक्यूलम व गुप्तिल बाद झाल्यानंतर ॲण्डरसनने ४६ चेंडू टोलवित आठ चौकार, दोन षटकारांसह संघाच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याने रोंचीसोबत (नाबाद २९) सहाव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. लंकेकडून मेंडिस आणि लकमल यांनी प्रत्येकी दोन तर हेरथ आणि कुलसेकरा यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)
..........................................................