Bengaluru IAF Wing Commander Road Rage Case: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर शिलादित्य बोस आणि त्यांच्या पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता दास यांच्यावर कथित हल्ला प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. रविवारी संध्याकाळी एका दुचाकीस्वाराने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा विंग कमांडर शिलादित्य बोस यांनी केला. दोन्ही अधिकारी त्यांच्या खाजगी कारमधून रमण नगर येथील डीआरडीओ कॉलनीतून विमानतळाकडे जात असताना ही घटना घडली. मात्र आता समोर आलेल्या सीसीटीव्हीमधून वेगळा प्रकार समोर आला आहे.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर बंगळुरूमध्ये हल्ला झाला. सध्या या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली. या हल्ल्यात विंग कमांडर बोस यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांनी स्वतः त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे घटनेची माहिती दिली. एका दुचाकीस्वाराने त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि कन्नड भाषेत शिवीगाळ करत त्याने त्याची गाडी ओव्हरटेक करुन पुढे थांबवली आणि शिवीगाळ सुरु केली.
त्यानंतर जेव्हा बोस जेव्हा गाडीतून बाहेर आले तेव्हा त्या व्यक्तीने त्यांच्या कपाळावर चावीने वार केले. दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीवर दगडही फेकला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला पुन्हा दुखापत झाली. मदतीसाठी आजूबाजूला पाहत असताना, जवळ उभे असलेले लोक मला आणि माझ्या पत्नीला शिवीगाळ करू लागले. व्हिडिओची दखल घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन विकास या दुचाकीस्वाराला अटक केली.
त्यानंतर आता बोस यांच्यासोबत झालेल्या वादाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कमांडरनेच तरुणावर हल्ला केल्याचे समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, दोघांमध्ये भाषेवरून वाद झाला. यानंतर, दोघेही एकमेकांशी भांडले, त्यानंतर विंग कमांडर बोसने त्या तरुणाला जमिनीवर आपटलं आणि त्याला पायाने लाथ मारली. त्यानंतर आदित्य बोसने तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरुच ठेवली. हे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल होत असू लोकांकडून योग्य कारवाईची मागणी केली जात आहे.